आपल्या केसांचं सौंदर्य हे फक्त बाह्य देखाव्यापुरतंच मर्यादित नसतं, तर ते आत्मविश्वासाचं प्रतीकही ठरतं. लांब, दाट आणि चमकदार केस ही अनेक स्त्रियांचीच नव्हे तर पुरुषांचीही इच्छा असते. पण आजकालच्या धावपळीच्या जीवनात, चुकीचे खानपान, तणाव, प्रदूषण आणि रासायनिक उत्पादनांचा मारा यामुळे केसांची गुणवत्ता झपाट्याने कमी होते. अनेक उपाय करूनही जेव्हा केस गळणे थांबत नाही, तेव्हा घरगुती आणि नैसर्गिक पर्यायांकडे वळण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही.

मोहरीचे तेल आणि बीटरूटची पाने
याच पार्श्वभूमीवर एका प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ञाने एक अतिशय साधा आणि प्रभावी उपाय सांगितला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ही पद्धत शंभर टक्के परिणामकारक असून फक्त आठवड्यातून तीन वेळा याचा वापर केल्यास केसांची वाढ इतकी होते की केस कमरपर्यंत पोहोचतात.
या रेसिपीची खासियत म्हणजे ती बनवायला खूपच सोपी आहे आणि त्यात वापरले जाणारे दोन्ही घटक आपल्या स्वयंपाकघरात सहज सापडतात. पहिले घटक म्हणजे मोहरीचे तेल, जे आपल्या केसांच्या मुळांना पोषण देण्याचे काम करते, आणि दुसरे म्हणजे बीटरूटची पाने जी केसांना नैसर्गिक रंग आणि ताकद देतात. या दोन्ही गोष्टी एकत्र करून तयार केलेले हे लालसर तेल केवळ केसांची वाढच नाही, तर गळतीही कमी करते आणि केसांना एक वेगळीच नैसर्गिक चमक देते.
तेल तयार करण्याची पद्धत
तेल तयार करण्याची पद्धतही अतिशय सोपी आहे. एक पॅन घ्या, त्यात आवश्यकतेनुसार मोहरीचे तेल गरम करा. हे तेल गरम झाल्यावर त्यात बीटरूटची ताजी पाने टाका. ही पाने काळसर होईपर्यंत मंद आचेवर शिजवा. एकदा तेल शिजून तयार झालं की, ते थंड होऊ द्या आणि मग बाटलीत भरून ठेवा.
हे तेल आठवड्यातून तीन वेळा केसांच्या मुळांमध्ये लावावे. हलक्या हातांनी मसाज करून थोडा वेळ ते तसंच राहू द्यावं. यामुळे मुळांपर्यंत पोषण मिळतं, रक्ताभिसरण सुधारतं आणि केसांची मुळं अधिक बळकट होतात. काही आठवड्यांतच केसांची लांबी आणि घनता वाढत असल्याचे लक्षात येते.