देशाची अणुशक्ती वाढणार, भारताला मिळणार जगातील सर्वात वेगवान बॉम्बर; रशियाशी झाला गुप्त करार!

Published on -

भारतीय हवाई दलाच्या भविष्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल ठरणारा निर्णय सध्या चर्चेत आहे, तो म्हणजे जगातील सर्वात वेगवान बॉम्बर आणि भारताचं सुप्रसिद्ध ब्रह्मोस क्षेपणास्त्र एकत्र करण्याची योजना. रशियाकडून Tu-160M “व्हाइट स्वान” बॉम्बर भाड्याने घेण्यासंबंधी भारताने एक करार केला आहे. हा करार केवळ सामरिक दृष्टिकोनातून नव्हे, तर भारताच्या जागतिक हवाई शक्तीतील स्थानासाठीही महत्त्वपूर्ण मानला जातो. पण यामागची कथा, त्यातले अडथळे आणि त्याचे राजकारण थोडं खोलवर समजून घ्यायला हवं.

भारत-रशियामधील करार

संपूर्ण जग जेव्हा इराण-इस्रायल संघर्षाकडे बघत होतं, तेव्हा अमेरिकेच्या B-2 बॉम्बरने इराणच्या अणुउर्जा केंद्रावर तडाखा दिला. भारतातही लगेच प्रश्न उपस्थित झाला, “आपल्याकडे अशा क्षमतेचं बॉम्बर विमान आहे का?” याच पार्श्वभूमीवर भारत आणि रशियामध्ये Tu-160M बॉम्बर्स भाड्याने घेण्यावर चर्चा झाली. हा बॉम्बर केवळ धडाकेबाजच नाही, तर त्याच्यात मॅक 2 म्हणजेच आवाजाच्या दोनपट वेगाने उड्डाण करण्याची क्षमता आहे. त्याची 12,000 किलोमीटरहून अधिक रेंज आणि जवळपास 40 टन पेलोडची ताकद त्याला जगातील सर्वोच्च दर्जाचं बॉम्बर बनवते.

या करारातली खरी खासियत म्हणजे या बॉम्बरमध्ये भारताचे ब्रह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्र एकत्र करण्यात येणार होते. हा एक ऐतिहासिक टप्पा ठरला असता, कारण ब्रह्मोस हे आधीच जगातील सर्वात वेगवान क्रूझ क्षेपणास्त्र मानलं जातं, आणि जेव्हा ते Tu-160M सारख्या विमानातून सोडलं गेलं असतं, तेव्हा भारताला असा आंतरखंडीय हल्ल्याचा पर्याय मिळाला असता, जो आजपर्यंत आपल्या सैन्याच्या हातात नव्हता.

करारावर अनिश्चिततेचं सावट

पण या स्वप्नात अचानक खंड पडला. शियाने युक्रेनवर चालवलेल्या दीर्घ युद्धामुळे या करारावर अनिश्चिततेचं सावट आलं. रशियन संरक्षण उद्योगावर युद्धजन्य मागणीचा प्रचंड ताण आहे. Tu-160M चे उत्पादन करणारी एकमेव कझान एअरक्राफ्ट प्रोडक्शन असोसिएशन (KAPO) आता युद्धसामग्री तयार करण्यातच गुंतलेली आहे. त्यांना लागणारी मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स, एव्हियोनिक्ससारखी यंत्रणा मिळवणंही अडचणीचं झालं आहे.

या साऱ्या पार्श्वभूमीत, भारताने हे विमान विकत घेण्याऐवजी काही काळासाठी भाड्याने घेण्याचा पर्याय स्वीकारला. कारण एका Tu-160M बॉम्बरची किंमत जवळपास 500 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच हजारो कोटींमध्ये जाते. इतका खर्च सध्या स्वीकारणं भारतासाठी सोपं नाही. त्यामुळे जसं आपण पूर्वी INS चक्रसारखी रशियन अणुशक्तीवर चालणारी पाणबुडी भाड्याने घेतली होती, तसाच मार्ग इथेही निवडला गेला.

या संपूर्ण व्यवहारामागे एक मोठं रणनीतिक चित्र आहे. चीन आपले H-6K आणि H-6N बॉम्बर्स अद्ययावत करत आहे. पुढच्या पिढीचे स्टेल्थ बॉम्बर्ससुद्धा त्यांच्या यादीत आहेत. आणि आपल्याला माहित आहे, की चीन वेळ येईल तेव्हा पाकिस्तानला ही तंत्रज्ञान सहज हस्तांतरित करतो. अशा वेळी भारतासाठी Tu-160M हा फक्त बॉम्बर नसून, आपल्या सामरिक व्याप्तीचा आणि ताकदीचा विस्तार करणारा एक निर्णायक हत्यार ठरू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!