आजच्या धावपळीच्या जगात हृदयविकार हा केवळ वृद्धांचे आजार राहिलेले नाहीत. लहान वयातच अनेकांना हृदयविकाराचा झटका येतो. यामागे मुख्य कारण म्हणजे चुकीच्या आहाराचे सेवन आणि व्यायामाचा अभाव. पण काही वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध सुपरफूड्सचा नियमित आहारात समावेश केला, तर हृदयाला होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकते. खालील 5 सुपरफूड्स तुम्ही तुमच्या आहारात कसे समाविष्ट करू शकता, ते जाणून घ्या.

बदाम
बदाम हे एक नैसर्गिक कोलेस्ट्रॉल नियंत्रक आहे. बदामात हेल्दी फॅट, फायबर्स आणि जीवनसत्त्वांचा समावेश असतो. हे कोलेस्ट्रॉलच्या पातळीत संतुलन ठेवते. दररोज 6 ते 8 बदाम सकाळी भिजवून खाल्ल्यास धमन्यांमध्ये साचणाऱ्या चरबीवर नियंत्रण मिळते. यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहतो.
ओट्स
ओट्समध्ये बीटा-ग्लुकन नावाचे फायबर असते, जे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल दूर करण्याचे काम करते. रोज सकाळी नाश्त्याला एक वाटी ओट्स खाल्ल्यास हृदय निरोगी राहते.
पालक
पालकमध्ये मॅग्नेशियम, लोह आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात, जे हृदयातील सूज कमी करून रक्ताभिसरण सुधारतात. आठवड्यातून 3 ते 4 वेळा पालकभाजी किंवा सूप स्वरूपात पालक खाणे फायदेशीर ठरते.
साल्मन मासे
साल्मन माशांमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड मोठ्या प्रमाणात असतो. ते हृदयाचे ठोके नियंत्रित ठेवते आणि रक्तदाबावरही परिणाम करते. आठवड्यातून 2 वेळा साल्मन मासे खाणे हृदयासाठी उत्तम आहे.
ब्लूबेरी
ब्लूबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन C असते. हे धमन्यांना स्वच्छ ठेवते आणि हृदयाला सशक्त करते. तुम्ही ब्लूबेरी स्मूदी, ओट्ससोबत किंवा स्नॅक म्हणून वापरू शकता.