तुरटी ही घरात असणारी साधी पण अद्भुत शक्ती असलेली वस्तू आहे. अनेक घरांमध्ये ती फक्त जखमा भरवण्यासाठी किंवा पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी वापरली जाते, पण वास्तुशास्त्रात तुरटीला एक विशेष स्थान आहे. तिचा उपयोग फक्त शरीरासाठी नाही, तर घराच्या उर्जेसाठीही प्रभावी मानला जातो. वास्तुदोषामुळे घरात सतत भांडणं, आजारपण, आर्थिक ताणतणाव जाणवत असेल, तर तुरटीचे काही छोटे उपाय नक्कीच उपयोगी ठरू शकतात.

घरातील अशांतात
ज्या घरात शांतता हरवलेली असते, जिथे माणसं एकमेकांशी सारखी कुरबुर करत असतात, अशा घरातील वातावरण बदलण्यासाठी तुरटी एक चमत्कारी उपाय ठरतो. एक छोटा तुकडा तुरटीचा, जर अंधाऱ्या कोपऱ्यात ठेवला, तर तो नकारात्मक उर्जा अलगद ओढून घेतो. ही ऊर्जा आपल्या डोळ्यांनी दिसत नाही, पण तिचा परिणाम मात्र घरातील प्रत्येकाच्या मन:स्थितीवर जाणवतो. त्यामुळे वास्तुशास्त्र सांगतं की, वेळोवेळी तो तुकडा बदलावा, जेणेकरून तो आपलं काम योग्य रीतीने करत राहील.
अपयशसाठीचा उपाय
कधी कधी प्रयत्न करूनही यश मिळत नाही. अशावेळी तुरटीचा वापर फारच उपयुक्त ठरतो. काळ्या कापडात गुंडाळून ती घराच्या मुख्य दरवाजावर लटकवल्यास घरात येणारी वाईट ऊर्जा अडवली जाते आणि सकारात्मकतेला वाट मोकळी होते. यामुळे कामात यश, जीवनात स्थैर्य आणि मनात नवा आत्मविश्वास जागृत होतो.
वारंवार आजारी पडणं
वास्तुदोषाचा अजून एक परिणाम म्हणजे वारंवार आजारी पडणं. घरातले लहानसहान आजार संपत नाहीत, डॉक्टरांच्या फेऱ्या थांबत नाहीत. अशा वेळी, घर पुसताना वापरायच्या पाण्यात थोडी तुरटी टाकून ते पाणी वापरल्यास घरात उर्जा संतुलित होते, आणि नकारात्मक शक्ती दूर जातात. या उपायामुळे आरोग्यातही हळूहळू फरक जाणवतो.
घरतील कुरबुरी
घराच्या दारांजवळ किंवा खिडक्यांच्या आसपास तुरटी ठेवणं हे देखील एक प्रभावी उपाय आहे. काही घरांत सतत कुरबुरी होतात, सुख शांतीचा अभाव जाणवतो. यावर उपाय म्हणून काचेच्या ताटात तुरटी ठेवून दर महिन्याला ती बदला. यामुळे घरात शांततेचा प्रवाह निर्माण होतो आणि रोजचं तणावपूर्ण वातावरण हळूहळू सौम्य होतं.
वाईट नजर
वाईट नजर लागण्याच्या समस्येपासून वाचण्यासाठी तुरटीचा ताबीज देखील वापरता येतो. लहान मुलांना हा ताबीज घालून दिल्यास त्यांचं संरक्षण होतं, असं शास्त्र सांगतं. तसंच, मुख्य दरवाजावर तुरटी लटकवण्यामागेही हाच हेतू असतो, घरात नको त्या उर्जा शिरू नयेत.
शेवटी, अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी हा एक गुप्त मार्गदर्शक ठरू शकतो. अभ्यासाच्या टेबलावर ठेवलेली तुरटी त्यांच्या एकाग्रतेला मदत करते. अभ्यासात मन लागत नसेल, तर ही पद्धत नक्की वापरून पाहावी.