सध्या मोबाईल वापरकर्त्यांना फक्त कॉलिंग किंवा थोडासा डेटा नको असतो, तर भरपूर इंटरनेटसह ओटीटी प्लॅटफॉर्मवरचा मोकळा वावर हवा आहे. विशेषतः त्यांना असे प्लॅन हवे आहेत जे दररोज भरपूर डेटा देतील आणि त्याचबरोबर Netflix, JioCinema, Hotstarसारख्या ओटीटी अॅप्सचा आनंददेखील घेता येईल. या पार्श्वभूमीवर जिओने काही भन्नाट प्रीपेड प्लॅन सादर केले आहेत, जे दररोज 2.5GB डेटा, ओटीटी सबस्क्रिप्शन, अमर्यादित कॉलिंग आणि इतर फायदे देतात.

₹399 चा प्लॅन
जर तुम्ही दररोज 2.5GB डेटाचा वापर करणारे आणि ओटीटीवर वेळ घालवणारे युजर असाल, तर जिओचे हे प्लॅन तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात. सर्वात प्रथम लक्ष वेधणारा प्लॅन म्हणजे ₹399 चा. 28 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लॅनमध्ये दररोज 2.5GB डेटा मिळतो आणि त्यासोबतच JioTV आणि JioCinemaसारख्या अॅप्सचा मोफत अॅक्सेस देखील दिला जातो. ही योजना त्या युजर्ससाठी विशेष आहे, जे OTT मनोरंजनासाठी मोबाईलवरच सर्व काही पाहतात.
₹2025 चा प्लॅन
जर तुम्हाला अधिक काळसाठी रिचार्ज करायचं असेल, तर ₹2025 चा प्लॅनदेखील एक चांगला पर्याय आहे. तब्बल 200 दिवसांची वैधता आणि दररोज 2.5GB डेटा मिळतो. यासह, JioTV आणि JioCinemaचा मोफत अॅक्सेस मिळतो, ज्यामुळे रोजच्या डेटा वापराच्या कटकटीपासून सुटका होते आणि OTT चं मनोरंजनही अखंड सुरू राहतं.
₹3599 चा प्लॅन
आणखी एका दीर्घकालीन पर्यायाकडे पाहायचं झालं, तर ₹3599 चा प्लॅन खूप फायदेशीर आहे. यात 365 दिवसांची वैधता दिली जाते आणि दररोज 2.5GB डेटासह ओटीटी अॅक्सेस मिळतो. त्यामुळे तुम्ही वर्षभर निश्चिंत राहू शकता. पण जर तुम्हाला काही अधिक मिळवायचं असेल, उदा. FanCode सारख्या क्रीडा-विशेष अॅप्सचा अॅक्सेससुद्धा तर ₹3999 चा प्लॅन निवडणे अधिक फायदेशीर ठरेल. यामध्येही 365 दिवसांची वैधता आहे, पण त्यात FanCodeसह अधिक वैविध्यपूर्ण कंटेंटचा अनुभव घेता येतो.
या सर्व प्लॅनची खासियत म्हणजे, पात्र युजर्सना अमर्यादित 5G डेटा दिला जातो. म्हणजेच, तुम्ही जर 5G फोन वापरत असाल आणि जिओच्या 5G कव्हरेज क्षेत्रात राहत असाल, तर तुम्हाला कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय सुपरफास्ट इंटरनेटचा अनुभव मिळतो. त्यासोबत, देशभरात कुठेही अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस या योजनेत समाविष्ट आहेत.