भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, जिथे प्रत्येक राज्य, शहर, गाव आणि जिल्हा यामागे एक खास गोष्ट लपलेली असते. भारताची ही रचना इतकी मोठी आणि गुंतागुंतीची आहे की, अनेक वेळा सामान्य माणसालाही प्रश्न पडतो देशात नेमके किती जिल्हे आहेत? आणि त्यापैकी सर्वात मोठा जिल्हा कोणता? या लेखात आपण याबाबतच सविस्तर माहिती पाहणार आहोत.

सुरुवात करूया मूलभूत प्रश्नाने भारतात एकूण किती राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आहेत? आजच्या घडीला देशात 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. प्रत्येकाचे वेगळे संस्कृतीकेंद्र, भाषा, परंपरा आणि प्रशासनिक रचना आहे. या राज्यांमध्ये वेगवेगळ्या संख्येने जिल्हे आहेत, जे त्या भागाचं स्थानिक प्रशासन सांभाळतात.
देशातील एकूण जिल्हे
जर आपण संपूर्ण देशातले जिल्हे मोजले, तर अलीकडच्या आकडेवारीनुसार भारतामध्ये एकूण 797 जिल्हे आहेत. त्यापैकी 752 जिल्हे राज्यांमध्ये तर 45 जिल्हे केंद्रशासित प्रदेशांमध्ये आहेत. मात्र, या संख्येतले काही जिल्हे अद्याप “प्रस्तावित” म्हणून ओळखले जातात. म्हणजे ते मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत. त्यामुळे ही आकडेवारी भविष्यात बदलण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यांची संख्या वाढवण्यामागे सरकारचा उद्देश आहे प्रशासन अधिक जवळीक ठेवणे, सुविधा ग्रामीण भागात पोहोचवणे, आणि विकासाच्या गतीला चालना देणे. विशेषतः लोकसंख्येने आणि क्षेत्रफळाने मोठ्या राज्यांमध्ये, नवीन जिल्ह्यांची निर्मिती ही एक गरज बनलेली आहे.
उत्तर प्रदेश सर्वात मोठं राज्य
उत्तर प्रदेश हे राज्य भारतातील सर्वाधिक जिल्ह्यांचं राज्य आहे. इथे 75 जिल्हे आहेत. हे राज्य केवळ लोकसंख्येनेच मोठं नाही, तर प्रशासकीय दृष्टिकोनातूनही खूप महत्त्वाचं आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हा सर्वात मोठा जिल्हा आहे, तर हापूर हा सर्वात लहान मानला जातो. दोघांची भूमिका आणि भौगोलिक वैशिष्ट्यं वेगळी असली तरी, दोघंही राज्याच्या सर्वांगीण विकासात मोलाचा वाटा उचलतात.
सर्वात मोठा जिल्हा कच्छ
मात्र, जर तुम्ही विचार करत असाल की, संपूर्ण भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे तर उत्तर आहे गुजरातमधील कच्छ जिल्हा. कच्छ हे नाव ऐकतानाच त्या विशाल, उघड्या, शुभ्र रणभूमीची आठवण येते. 45,674 चौरस किलोमीटर इतक्या भव्य क्षेत्रफळाचा हा जिल्हा आहे. म्हणजेच, कच्छ एकट्यानेच गुजरात राज्याचा सुमारे 23.7 टक्के भाग व्यापून आहे. ही गोष्ट स्वतःमध्येच थक्क करणारी आहे.
कच्छ जिल्ह्याचं सर्वात वैशिष्ट्यपूर्ण आकर्षण म्हणजे त्याचा “कच्छचा रण” हे जगातील सर्वात मोठं खारट वाळवंट मानलं जातं. पावसाळ्यात इथं पाणी साचतं, तर उरलेल्या काळात ते कोरडं, पांढरं रण होतं. याच अनोख्या स्वरूपामुळे ते केवळ भूगोलात नव्हे, तर पर्यटन आणि सांस्कृतिक महत्त्वाच्या दृष्टिकोनातूनही एक खास स्थान मिळवतं. दरवर्षी येथे होणारा “रण उत्सव” देशविदेशातील हजारो पर्यटकांना आकर्षित करतो.