महाभारतासारख्या प्राचीन ग्रंथात अनेक पात्रं, कथा आणि गूढ गोष्टी दडलेल्या आहेत. त्यातील काही प्रसिद्ध आहेत, तर काही इतकी दुर्लक्षित राहिलीत की, त्यांचा उल्लेख फारच थोडक्याच ठिकाणी सापडतो. अशीच एक कथा आहे द्रौपदीच्या मुलीबद्दल. होय, आपण सगळे द्रौपदीला पाच पांडवांची पत्नी आणि त्यांच्या मुलांची आई म्हणून ओळखतो, पण फारच थोड्या लोकांना माहीत असतं की द्रौपदीला एक मुलगीही होती. ही कथा केवळ कौतुकाचीच नाही, तर आश्चर्यकारक देखील आहे, कारण तिचा संबंध थेट भगवान श्रीकृष्णाशी आहे.

द्रौपदी ही राजा द्रुपदाची कन्या. स्वयंवरात अर्जुनाने माशाच्या डोळ्यात बाण घालून तिचं मन जिंकलं आणि तिच्याशी विवाह केला. पण आई कुंतीमुळे द्रौपदी पाचही पांडवांची पत्नी झाली. या विवाहातून द्रौपदीला प्रत्येक पांडवापासून एक एक मुलगा झाला. प्रतीविंध्य, सुतसौम, श्रुतकर्मा, शतानिक आणि श्रुतसेन. या मुलांचा उल्लेख महाभारतात वेळोवेळी केला जातो. मात्र या मुलांबरोबरच तिच्या एका मुलीचा उल्लेख फारच कमी लोकांनी ऐकला आहे.
सुथानूची कथा
पुराणकथांनुसार, या मुलीचं नाव होतं सुथानू. ती युधिष्ठिर आणि द्रौपदीची कन्या होती. पण महाभारतात तिच्याबद्दल फारसं काही लिहिलेलं आढळत नाही. असं मानलं जातं की वेदव्यासांनी सुथानूचा उल्लेख ग्रंथात न करण्याचा शब्द द्रौपदीकडून घेतला होता. यामागे काय कारण होतं, हे स्पष्ट नाही, पण तिची कथा तोंडी परंपरेतून आणि काही पुराणांमध्ये टिकून राहिली आहे.
सुथानूची कथा इतकी गूढ आहे की तिचा विवाहही एका अत्यंत विशिष्ट व्यक्तीशी झाला होता. श्रीकृष्ण आणसत्यभामेचा पुत्र भानूशी. म्हणजेच, द्रौपदीची मुलगी साक्षात श्रीकृष्णाची सून झाली होती. एका अर्थाने, त्यांच्या नात्यात एक पवित्र आणि कौटुंबिक पैलू जोडला गेला होता, जो फक्त मैत्रीपुरता सीमित राहिला नव्हता.
श्रीमद्भागवत, हरिवंश आणि इतर काही ग्रंथांमध्ये सुथानू आणि भानूचा उल्लेख सापडतो. मात्र या दोघांचं नाव महाभारतातील मुख्य प्रवाहात न घेतल्यामुळे त्यांची ओळख अनेक शतकांपासून दुर्लक्षित राहिली. द्रौपदीसारख्या प्रभावशाली स्त्रीच्या मुलीबद्दल फारशी माहिती न मिळणं हेच या कथेला एक वेगळं गूढपण देतं.
द्रौपदी आणि श्रीकृष्ण यांचं नातं
द्रौपदी आणि श्रीकृष्ण यांचं नातं आधीपासूनच खूप खास होतं. श्रीकृष्ण तिला सखा म्हणून मानत आणि अनेक संकटांच्या वेळी तिची मदत करत. पण या कथेनुसार, त्यांच्या नात्याला आणखी एक वेगळं नाव दिलं .
ही कथा आजही अनेकांच्या माहितीत नाही. पण ती महाभारताच्या प्राचीन, गूढ आणि रहस्यपूर्ण कथांच्या जगात एक नवा प्रकाश टाकते.