अत्यंत मौल्यवान असूनही बँक हिऱ्यावर कर्ज का देत नाही?, कारण ऐकून आश्चर्य वाटेल!

Published on -

आजच्या डिजिटल आणि आर्थिकदृष्ट्या प्रगत जगात, कर्ज घेणे हे केवळ गरज नसून अनेकांसाठी एक सामान्य गोष्ट झाली आहे. घराच्या कर्जापासून ते शिक्षणासाठी किंवा सोन्यावर घेतलेल्या कर्जापर्यंत, बँका अनेक मालमत्तांना गहाण ठेवून कर्ज देतात. मात्र, एक प्रश्न अनेकांना पडतो हिरा इतका मौल्यवान असूनही त्यावर कर्ज का दिलं जात नाही? हा प्रश्न जितका स्वाभाविक आहे, तितकंच त्याचं उत्तर गुंतागुंतीचं आहे.

हिऱ्यांवर बँक लोन का देत नाही?

हिऱ्यांची किंमत ठरवणं ही एक अत्यंत तांत्रिक आणि तज्ञांचा अनुभव असलेली प्रक्रिया असते. ‘4Cs’ म्हणजेच कट, क्लॅरिटी, कलर आणि कॅरेट या चार घटकांच्या आधारे हिऱ्याचे मूल्य ठरवले जाते. पण ही मोजमापे एखाद्या सामान्य बँक कर्मचाऱ्याला नेमकी कशी समजावून देता येतील? शिवाय, नकली हिरे, जेड किंवा इतर क्रिस्टलशी गोंधळ होण्याचा धोका देखील बँकांना असतो. म्हणूनच बँका हिऱ्यांच्या मूल्यांकनात फारसा विश्वास दाखवत नाहीत.

याउलट सोने हे एक द्रव मालमत्ता (liquid asset) मानले जाते. म्हणजेच बाजारात त्याला सहजपणे विकता येते आणि त्याची किंमतही सार्वत्रिकरीत्या ज्ञात असते. हिरे मात्र द्रव मालमत्ता नसल्यामुळे त्यांचं रोखीकरण तातडीने आणि विश्वासाने होऊ शकत नाही. त्यामुळे, बँकेसाठी तो व्यवहारिक दृष्टिकोनातून जोखमीचा व्यवहार ठरतो.

तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे वसुली. जर कोणी कर्ज वेळेत फेडू शकला नाही, तर बँकेकडे गहाण ठेवलेली मालमत्ता विकून तो पैसा परत मिळवण्याचा मार्ग असतो. मात्र, हिऱ्यांच्या अनिश्चित किंमतीमुळे आणि खरेदीदारांची मर्यादित संख्या लक्षात घेता, बँकांना हे शक्य होत नाही. त्यामुळे अशा मालमत्तेवर कर्ज देणं म्हणजे बँकांसाठी आर्थिक धोक्याचं दार उघडणं ठरतं.

बँकांमधील धोरणानुसार, दागिन्यांमध्ये जर हिरे जडवलेले असले, तरी कर्ज केवळ सोन्याच्या मूल्यावरच दिलं जातं. कारण हिरा हे जरी शोभिवंत आणि मूल्यवान वाटत असले, तरी बँकेच्या दृष्टिकोनातून तो गहाण ठेवण्यायोग्य मालमत्ता मानली जात नाही. शिवाय, हिऱ्यांच्या बाजारपेठेत आवश्यक तेवढी पारदर्शकता नाही, त्यामुळे बँकिंग क्षेत्रासाठी ही मोठी अडचण आहे.

सोने, जमीन किंवा मुदत ठेवला महत्व

तसेच, अनेकदा हिऱ्यांमध्ये फसवणूक, बनावटपणा किंवा अपारदर्शी व्यवहार आढळतात. काही व्यापारी या माध्यमातून भाडेपट्टा किंवा निर्यात क्रेडिट घेऊन बँकांना गंडा घालण्याचा धोका निर्माण करतात. त्यामुळे बँकांना त्यांच्या जोखमीचे प्रमाण अनावश्यकरीत्या वाढते.

म्हणूनच, हिरा हा मौल्यवान असूनही बँकांसाठी विश्वसनीय नाही. सोने, जमीन किंवा मुदत ठेव यांसारख्या मालमत्ता आजही बँकिंग व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सुरक्षित मानल्या जातात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!