7th Pay Commission : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता नुकताच वाढवण्यात आला. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55 टक्के करण्याचा निर्णय झाला असून ही महागाई भत्ता वाढ जानेवारी 2025 पासून लागू करण्यात आली आहे. मार्च महिन्यात सरकारने या महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय घेतला.
म्हणजेच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळाली. दरम्यान केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीचा निर्णय झाल्यानंतर आता देशातील विविध राज्य शासनाच्या माध्यमातून तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जातोय.

या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला!
खरे तर एक जानेवारी 2025 पासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 2% ने वाढवण्यात आला असून याबाबतचा निर्णय मार्च महिन्याच्या शेवटी घेण्यात आला. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांची महागाई भत्ता कर्काची रक्कम सुद्धा मिळाली.
दोन टक्के महागाई भत्ता वाढीचा निर्णय झाल्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55% इतका झाला असून आता याच धर्तीवर विविध राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा सुधारित केला जात आहे.
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत केंद्र सरकारच्या धर्तीवर देशातील ओडिशा , उत्तर प्रदेश , मध्य प्रदेश , राजस्थान , हरियाणा , आसाम राज्य सरकारने तेथील राज्य कर्मचारी / पेन्शन धारकांच्या डी.ए मध्ये 2 टक्के वाढ करण्यास मंजूरी दिलेली आहे. दरम्यान, या राज्य कर्मचाऱ्यांनंतर आता तामिळनाडू राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा सुधारित करण्यात आला आहे.
तामिळनाडू राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा दोन टक्क्यांनी सुधारित करण्यात आला असून यामुळे त्या संबंधित राज्यातील तब्बल 16 लाख राज्य कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी एक गोष्ट विशेष नमूद करण्यासारखी
ती म्हणजे तामिळनाडू राज्य सरकारने फक्त राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित केला असे नाही तर राज्यातील कर्मचाऱ्यांना सण अग्रीमाची रक्कम सुद्धा वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे. तामिळनाडू राज्य सरकारने राज्य कर्मचाऱ्यांची सण अग्रीम रक्कम दहा हजार रुपयांवरून 20000 रुपये एवढी केली आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता नेमका कधी वाढणार
केंद्रीय कर्मचाऱ्यांनंतर देशातील जवळपास सात राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित करण्याचा निर्णय झालेला आहे. यामुळे आता राज्यातील राज्य कर्मचारी आमचा महागाई भत्ता कधी सुधारित होणार हा मोठा सवाल उपस्थित करत आहेत.
दरम्यान मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर येत्या काही दिवसांनी महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा 53 टक्क्यांवरून 55% इतका होणार असून त्यांना सुद्धा महागाई भत्ता फरकाची रक्कम या ठिकाणी वितरित केली जाणार आहे.