Maheshwar Peri Vs Vivek Bindra : गेल्या काही दिवसांपासून मोटिवेशनल स्पीकर, युट्युबर आणि बडा बिजनेसचे सीईओ उद्योगपती विवेक बिंद्रा चर्चेत आले आहेत. मात्र विवेक बिंद्रा आपल्या मोटिवेशनल व्हिडिओ मुळे नव्हे तर एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहेत.
प्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर संदीप माहेश्वरी यांनी विवेक बिंद्रा यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. माहेश्वरी यांनी विवेक बिंद्रा यांच्यावर मल्टी लेवल मार्केटिंग करत असल्याचा आरोप केला आहे. विवेक बिंद्रा यांनी तब्बल 500 कोटींचा स्कॅम केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे माहेश्वरी यांनी हे प्रकरण आता कायदेशीर मार्गाने पुढे नेणार असे संकेत दिले आहेत. दरम्यान या सर्व प्रकरणांमध्ये महेश्वर पेरी यांची एन्ट्री झाली आहे. आता निश्चितच तुम्हाला महेश्वर पेरी हे कोण आहेत? हा प्रश्न पडला असेल.
तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की पेरी हे करिअर्स 360 चे फाउंडर आणि चेअरमन आहेत. पेरी यांनी गेल्या काही वर्षांपूर्वी आयआयपीएम आणि अरिंधम चौधरी यांना कोर्टात आव्हान दिले होते. विशेष म्हणजे त्यांच्या पब्लिक लिटिगेशन केसेस खूपच लेजेंडरी आहेत.
त्यांनी आयआयपीएम आणि अरिंधम चौधरी यांच्याविरोधात लढवलेल्या केसेसमध्ये एकट्याने हा खटला जिंकला होता. दिल्ली हायकोर्टाने आयआयपीएम हे मॅनेजमेंट इन्स्टिट्यूशन नसल्याचा निकाल दिला आहे. परिणामी आयआयपीएमला त्यांचे सर्व कॅम्पस बंद करावे लागले.
दरम्यान आता विवेक बिंद्रा प्रकरणांमध्ये पेरी यांची इंट्री झाली असल्याने विवेक बिंद्रा यांचे प्रकरण देखील आता कोर्टात जाणार हे जवळपास स्पष्ट होऊ लागले आहे. पेरी यांनी आता विवेक बिंद्रा यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
त्यांनी विवेक बिंद्रा यांना तुम्ही कोणत्या बेसिसवर मुलांना बिझनेस मॅनेजमेंटचे धडे दिलेत असा सवाल उपस्थित केला आहे. त्यांनी मुलांना बिजनेसचे कोणते धडे दिलेत याबाबत विचारणा केली आहे तसेच ते पैसे कसे कमवतात? याची डिटेल्स द्या असे सांगितले आहे.
पेरी यांनी बिंद्रा यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी दहा दिवसांचा एमबीए कोर्स, IBC बिझनेस मॉडेल बाबत देखील प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रोग्राम अंतर्गत बिंद्रा एक कोर्स ऑफर करतात ज्यामध्ये 50 हजार रुपये फी आकारले जाते.
विशेष म्हणजे हा कोर्स केल्यानंतर कोणीही एका लाखापासून ते वीस लाखांपर्यंतची कमाई करू शकतात असा देखील दावा ते करतात. मात्र, या कोर्समध्ये प्रवेश घेतलेल्या मुलांच्या माध्यमातून हा कोर्स पुढे सेल केला तर त्यांना कमाई होते असं दावा करण्यात आला आहे.
एकंदरीत हा मल्टी लेव्हल मार्केटिंगसारखाचं स्कॅम आहे. मल्टी लेव्हल मार्केटिंग ही आपल्या देशात बॅन आहे. यामुळे आता महेश्वर पेरी यांनी त्यांच्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. महेश्वर यांनी विवेक बिंद्रा यांचे अकाउंटची देखील माहिती दिली आहे.
पेरीने बिंद्रा यांनी 2022-23 मध्ये तब्बल 308 कोटी रुपये कमावले असल्याचा दावा केला आहे. यापैकी जवळपास 74 टक्के रक्कम ही नॉन रिफ़ंडेबल आहे. पेरीने फक्त त्यांच्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत असे नाही तर ते आता हे सर्व प्रकरण कोर्टात खेचणार आहेत. त्यामुळे आता हे प्रकरण नेमके कोणते वळण घेते हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.