नगरचा आवाज घुमतोय महाराष्ट्रात. KP बनलाय महाराष्ट्रातील अनेक आमदारांचा आवाज. उध्दव KP च्या आवाजाला राज्यभरातुन मागणी…

Published on -

अहिल्यानगर : आपण 21 व्या शतकात आहोत, हे शतक मोबाईल आणि कम्प्युटरचे आहे. अगदी लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत साऱ्यांकडे तुम्हाला स्मार्टफोन पाहायला मिळणार आहे.

हेच कारण आहे की या युगाला मोबाईलचे युग म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. स्मार्टफोनमुळे सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर होतोय. म्हणून सध्याच्या युगाला आपण सोशल मीडियाचे युग म्हणू शकतो.

प्रत्येक जण सोशल मीडियाचा वापर करतो आणि यामुळे आता कामाची पद्धत देखील बदलली आहे. काम दाखवा आणि प्रभाव पाडा असं आजचं युग आहे. सोशल मीडियाचा वापर हा फारच अनलिमिटेड झाला आहे.

आता निवडणुकीच्या प्रचारासाठी देखील सोशल मीडियाचा वापर होतोय. पण या कामाचा सगळ्यात महत्वाचा भाग हा व्हिडीओ प्रोडक्शनचा आहे. दरम्यान, याच व्हिडीओ प्रोडक्शनच्या कामात अहिल्यानगर चा एक भारदस्त आवाज सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत आहे.

सध्या सुरू असणाऱ्या या निवडणुकांमध्येही या आवाजाची फारच चर्चा आहे. उद्धव काळापहाड म्हणजेच KP च्या आवाजाची सध्या महाराष्ट्रात डिमांड आहे. KP च्या टीमने नुकत्याच काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रभावी काम केले होते.

म्हणून आता विधानसभा निवडणुकीत त्यांच्या टीमला जबरदस्त मागणी आली आहे. व्हिडीओ प्रोडक्शन मध्ये व्हिडिओजला असणारा आवाज, स्लोगन-त्याचा आवाज, आवाजाच्या माध्यमातून जनतेसमोर येणारे मुद्दे हे महत्वाचे असते. उद्धव काळापहाड यांनी हीच नस चांगली ओळखली आहे.

उद्धव ग्रामीण भागातील लोकांची नस जाणतो. मराठवाडा असुद्यात की विदर्भ की खानदेश किंवा पश्चिम महाराष्ट्र त्या-त्या भागानुसार KP आपला आवाजात बदल करत तिकडच्या लोकांच्यात लोकप्रिय आवाज बनतो.

हे त्याचे खास वैशिष्ट्य आहे. हेच वैशिष्ट्ये त्याला इतरांपेक्षा वेगळे बनवते. उद्धव काळापहाड तसा अगदीच ग्रामीण भागातून आलेला तरुण. आवाजाच्या क्षेत्रात आपले पाय घट्ट रोवत असतानाच राजकारणाची विशेष आवड असल्याने त्याने पुढे राजकिय स्ट्रॅटेजी, सल्ला,इमेज बिल्डिंग,नेत्यांचे भाषणांचे मुद्दे काय असावेत? यासंदर्भात अभ्यासू आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यशस्वी मार्गदर्शन केले.

सूत्रसंचालक म्हणून गावोगावी फिरत असतांना बारकाईने केलेले निरीक्षण, अफाट जनसंपर्क यामुळे जनतेच्या मनात नेमकं काय चाललंय याचा अचूक अंदाज त्यांना येतो आणि राजकिय काम करणे त्यांना अधिक सोप्पे जाते.

आलेली स्क्रिप्ट वाचून दाखवणे एवढेच काम व्हॉइस ओव्हर आर्टिस्टचे नसून त्यावर स्वतः अभ्यासू विवेचन करत स्वतःचे मुद्दे त्यात ऍड करणे, आकर्षक ओळी देणे, कॅची स्लोगन देणे हे काम ते करतात.

त्यांच्या कामावर खुश होत अनेकजण त्यांच्याकडून काम करून घेण्यास इच्छुक असतात. आजघडीला राज्यातील किमान 35 विद्यमान आणि इच्छुक आमदारांना उध्दवने आवाज दिला आहे.

नगरसाठी ही बाब अतिशय अभिमानाची आहे. प्रस्थापित अभिनेते,व्हाईस ओव्हर आर्टिस्ट यांच्या बरोबरीने आज उध्दवचा आवाज राज्यभरात घुमतोय, ही गोष्ट विशेष वाखाणण्याजोगी आहे.

पक्ष कोणताही असो, व्यक्ती कोणीही असो सिक्रेट जपणे हे प्राधान्य हे उध्दवचे ब्रीद आहे. स्ट्रॅटेजी हा प्रत्येक निवडणुकीचा आत्मा असतो. ती टोकाची सिक्रेट ठेवावी असं उध्दवचे मत आहे. जो पहिला येईल त्याचे काम स्वीकारायचे आणि अत्यंत प्रामाणिकपणे त्यांचेच काम करायचे हे उध्दवचे कामाचे तत्व.

पैशापेक्षा विश्वास जपणे आणि यश मिळवणे यासाठी तो अधिक प्रयत्न करतो. उद्धवने अतिशय कमी वयात हे जे कौशल्य प्राप्त केले आहे त्यासाठी त्याचे कौतुक होत असते. आवाज देणे हे त्याचे मुख्य काम असले तरी निवडणूक कशी हाताळावी? जिंकण्यासाठी काय काय करावे यासंदर्भात त्याच्या असलेल्या संकल्पना या अफलातून असतात.

एखादा तरुण आपल कौशल्य, तत्व, बुद्धिमत्ता या जीवावर किती पुढे जाऊ शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे उद्धव काळापहाड उर्फ KP. उद्धव काळापहाड जिथे जातो त्या लोकांच्या गळ्यातील ताईत बनतो अन माणस आपल्या आवाजाने जोडणे हा त्याचा छंद आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe