आनंदाची बातमी ! अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू

श्रीक्षेत्र मोहटा देवस्थानच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने नवीन वर्षाच्या अनुषंगाने हे एक मोठे गिफ्ट असल्याचे बोलले जात आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांची गेल्या अनेक दिवसांपासून ची मागणी पूर्ण होणार आहे. यामुळे या संबंधित 65 कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आनंदाचे वातावरण आहे.

Tejas B Shelar
Published:
Ahilyanagar News

Ahilyanagar News : अहिल्या नगर जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील श्री क्षेत्र मोहटा देवस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या देवस्थानच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा मोठा निर्णय नुकताच झाला असून या निर्णयामुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.

श्रीक्षेत्र मोहटा देवस्थानच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने नवीन वर्षाच्या अनुषंगाने हे एक मोठे गिफ्ट असल्याचे बोलले जात आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांची गेल्या अनेक दिवसांपासून ची मागणी पूर्ण होणार आहे.

यामुळे या संबंधित 65 कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आनंदाचे वातावरण आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की पाथर्डी येथील श्री क्षेत्र मोहटा देवस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत घेण्यात आलेला हा निर्णय एक जानेवारी 2025 पासून लागू राहणार आहे.

श्री क्षेत्र मोहटा देवस्थानच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू व्हावा, तसेच मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग मिळावा या अनुषंगाने २०१९ साली अहिल्यानगर येथील कामगार न्यायालयात मागणी करण्यात आली होती.

पुढे याच बाबत कर्मचाऱ्यांनी मार्च 2024 मध्ये उपोषण देखील केले होते. तसेच याबाबत नुकत्याच काही दिवसांपूर्वी एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली होती. देवस्थान समितीचे चेअरमन तथा जिल्हा सत्र न्यायाधीश महेश लोणे यांच्या अध्यक्षतेखाली ही महत्त्वाची बैठक संपन्न झाली.

यात सातवा वेतन आयोगाबाबत चर्चा झाली आणि सातवा वेतन आयोग लागू करण्याचा ठराव संमत करण्यात आला. मानधनावर काम करणारे ४८ कर्मचारी, तर सहाव्या वेतन आयोगानुसार काम करणारे १७ कर्मचारी अशा ६५ कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी पासून सातव्या वेतन आयोगानुसार वेतन व भत्ते लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

शिवाय, सेवाज्येष्ठता ही कर्मचाऱ्यांच्या ज्या तारखेपासून पीएफ कपात करण्यात आला, त्या तारखेपासून धरण्याचा, तसेच मागील सानुग्रह अनुदान म्हणून प्रत्येक कर्मचाऱ्याला १,२१,००० रुपये देखील देण्याचा निर्णय घेण्यात आला.

ठराव संमत होताच कर्मचाऱ्यांनी देवस्थान समितीचे आभार मानले आहेत. नवीन वर्षाच्या आधीच हा मोठा निर्णय घेण्यात आला असल्याने संबंधित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून तसेच त्यांच्या कुटुंबांच्या माध्यमातून आनंदोत्सव साजरा केला जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe