2025 मध्ये अहिल्यानगरात तयार होणार 3 नवीन उड्डाणपूल ! 100 खाटांचे स्त्री रुग्णालय, महसूल भवनही होणार, जिल्ह्यातील कोणकोणते प्रकल्प मार्गी लागणार ?

अनेक प्रकल्पांची कामे या नव्या वर्षात सुरु होणार आहेत. शहरात तीन नवीन उड्डाण पूल तयार होणार आहेत, महसूल भवन देखील तयार होणार आहे, स्त्रियांचे आरोग्य लक्षात घेता 100 खाटांचे स्त्री रुग्णालय देखील बांधले जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून 13 आरोग्य केंद्रांचा तिढा देखील सोडवला जाणार आहे. मुळा विभाग अंतर्गत कालव्यांचे अस्तरीकरण व मजबुतीकरण होणार आहे.

Tejas B Shelar
Published:
Ahilyanagar News

Ahilyanagar News : नवीन वर्ष अहिल्यानगर शहरातील आणि जिल्ह्यातील नागरिकांसाठी विशेष खास ठरणार आहे. कारण की या नव्या वर्षात अहिल्या नगर मधील अनेक प्रस्तावित प्रकल्प मार्गी लागणार आहेत. अनेक प्रकल्पांची कामे या नव्या वर्षात सुरु होणार आहेत. शहरात तीन नवीन उड्डाण पूल तयार होणार आहेत, महसूल भवन देखील तयार होणार आहे, स्त्रियांचे आरोग्य लक्षात घेता 100 खाटांचे स्त्री रुग्णालय देखील बांधले जाणार आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून 13 आरोग्य केंद्रांचा तिढा देखील सोडवला जाणार आहे. मुळा विभाग अंतर्गत कालव्यांचे अस्तरीकरण व मजबुतीकरण होणार आहे. नागापूर एमआयडीसी मध्ये नवीन उद्योग देखील येणार आहेत. अशा परिस्थितीत आता आपण वर्ष 2025 मध्ये अहिल्यानगर शहरातील आणि जिल्ह्यातील कोणकोणते प्रकल्प मार्गी लागणार याचा सविस्तर आढावा घेणार आहोत.

अहिल्यानगर शहरात तयार होणार तीन उड्डाणंपुल

डीएसपी चौक, सह्याद्री चौक आणि सन फार्मा चौक या तीन ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून उड्डाणपुलं विकसित केले जाणार आहेत. खरे तर या तिन्ही उड्डाणपूलांसाठी पोत तपासणी करण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्यात सुरू झालेले हे काम नुकतेच पूर्ण झाले आहे.

यामुळे या उड्डाणपूलांच्या कामाला गती मिळणार आहे. या तिन्ही उड्डाणपूलांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून 123 कोटी रुपये खर्च केले जातील. हे उड्डाणपूल येत्या दोन वर्षात पूर्ण होतील आणि त्यानंतर प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाचणार आहे. प्रवाशांचा जवळपास 36 मिनिटांचा वेळ यामुळे वाचेल असा विश्वास व्यक्त होतोय.

कस असणार 100 खाटांचे स्त्री रुग्णालय?

शहरात 100 खाटांचे स्त्री रुग्णालय बांधले जाणार आहे. खरे तर या प्रकल्पाला 2013 मध्येच मंजुरी मिळाली होती. मात्र अजून या प्रकल्पाचे काम सुरू झालेले नाही पण येत्या काही दिवसात याचे काम सुरू होणार आहे. यासाठी 33 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे म्हटले जात आहे. यासोबतच शहरात आणखी शंभर खाटांचे माता बालक रुग्णालय विकसित होणार असून या दोन्ही रुग्णालयांची कामे नव्या वर्षात सुरू होण्याची दाट शक्यता आहे.

नव्या वर्षात महसूल भवनाच्या कामाला सुरुवात होणार

सावेडी या ठिकाणी महसूल भवन तयार होत असून सध्या याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या नव्या वर्षात या भवनाची निर्मिती शक्य आहे. हे तीन मजली भवन असून यासाठी 34 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. यामध्ये विविध शासकीय कार्यालये तयार होतील. म्हणजेच अहमदनगर शहरातील तसेच जिल्ह्यातील नागरिकांना एकाच छताखाली सर्व कार्यालयांचा ॲक्सेस मिळणार आहे. यामुळे नागरिकांची फरपट थांबणार आहे.

नागापूर एमआयडीसी मध्ये नवीन उद्योग येणार

नागापूर एमआयडीसी मध्ये गेल्या एका दशकाच्या काळात फार मोठे उद्योग दाखल झालेले नाहीत. पण आता एमआयडीसीच्या नजीकच 600 एकर जागा उपलब्ध झाली असून यामुळे भविष्यात या ठिकाणी मोठमोठ्या कंपन्या दाखल होताना आपल्याला दिसतील. एमआयडीसीच्या नजीक असणाऱ्या वडगाव गुप्ता या ठिकाणी 600 जागा उपलब्ध झाली असून या नव्या एमआयडीसीमध्ये अनेक ऑटोमोबाईल कंपन्या सुरू होणार अशी शक्यता आहे. यामुळे हे राज्यातील एक प्रमुख ऑटोमोबाईल हब म्हणून उदयास येऊ शकते.

तेरा आरोग्य केंद्रांचा तिढा सुटणार

अहिल्यानगर जिल्हा परिषद कडून तेरा आरोग्य केंद्रांचा तिढा यावर्षी सुटू शकतो. जिल्ह्यात एकूण 115 आरोग्य केंद्र आहेत. यातील सहा आरोग्य केंद्र पर्यायी जागेत सुरू आहेत. मात्र चार आरोग्य केंद्रांना जागा मिळत नाहीये, पाच आरोग्य केंद्रांसाठी पदे मंजूर नाहीत, तसेच चार आरोग्य केंद्रांचे बांधकाम सध्या सुरू आहे. दरम्यान या 13 आरोग्य केंद्रांचा हा संपूर्ण तिढा या नव्या वर्षात सुटू शकतो आणि हे 13 आरोग्य केंद्र सर्वसामान्यांसाठी सुरू होऊ शकतात.

70 कोटींचा हा प्रकल्प पाण्याचा अपव्यय टाळणार

मुळा विभाग अंतर्गत येणारे काही कालवे सध्या नादुरुस्त आहेत. यामुळे मात्र दरवर्षी 700 दशलक्ष घनफूट पाण्याचा अपव्यय होत आहे. यामुळे 70 कोटी रुपये खर्च करून हे कालवे दुरुस्त केले जाणार आहेत. कालव्यांच्या अस्तरीकरणाचे आणि दुरुस्तीकरणाचे काम या नव्या वर्षात होऊ शकते असा दावा केला जातोय. असे झाल्यास जिल्ह्यातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe