अहमदनगरकरांनो काळजी घ्या ! आज आणि उद्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस, ‘या’ नद्यांना पूर येणार ?

आज आणि उद्या अहमदनगर जिल्ह्यातील बहुतांश भागांमध्ये जोरदार पावसाची शक्‍यता आहे. तसेच 25 सप्टेंबरला जिल्ह्यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार अशी शक्यता असून या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Tejas B Shelar
Published:
Ahmednagar Weather Update

Ahmednagar Weather Update : अहमदनगर शहरातील नागरिकांसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी हाती आली आहे. ही बातमी आहे पावसा संदर्भात. भारतीय हवामान खात्याने अहमदनगर जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. खरंतर राज्यात गेली काही दिवस सुट्टीवर असणारा पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे.

दरम्यान भारतीय हवामान खात्याने आजपासून राज्यातील पावसाची तीव्रता वाढणार असा अंदाज दिला आहे. राज्यात जवळपास 27 सप्टेंबर पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसाचा जोर उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात अधिक राहणार असे हवामान खात्याने आपल्या नवीन बुलेटिन मध्ये स्पष्ट केले आहे.

आज आणि उद्या अहमदनगर जिल्ह्यातील बहुतांश भागांमध्ये जोरदार पावसाची शक्‍यता आहे. तसेच 25 सप्टेंबरला जिल्ह्यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार अशी शक्यता असून या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर आणि पुण्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला तर यामुळे जिल्‍ह्यातील भीमा व घोड नदी, गोदावरी नदी तसेच प्रवरा व मुळा या नद्यांवरील धरणातून सोडलेल्‍या विसर्गामुळे नद्यांच्‍या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.

यामुळे या नदीकाठी वसणाऱ्या नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली तर नदीकाठी असणाऱ्या लोकांचे नुकसान होण्याची भीती आहे. नद्यांची पाणी पातळी वाढली तर नदीकाठी असणाऱ्या शेतजमिनीतील शेती पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.

या पाण्यामुळे जनावरांचे देखील नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपली, शेतीमालाची आणि पशुधनाची विशेष काळजी घ्यावी असे आव्हान जाणकारांनी केले आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की मान्सूनचा परतीचा प्रवास कालपासून सुरू झाला आहे. पश्चिम राजस्थान आणि कच्छ भागातून कालपासून मान्सून ने माघारी परतण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान परतीचा प्रवास आता सुरू झाला असल्याने महाराष्ट्रात देखील पावसाचा जोर वाढत आहे. महत्त्वाचे म्हणजे यंदा राज्यात परतीचा पाऊस मनसोक्त बरसण्याचे चिन्ह तयार होत आहेत. त्यामुळे मान्सून जाता जाता महाराष्ट्राला चांगलाच दणका देणार असे दिसत आहे. म्हणून आगामी काही दिवस राज्यातील नागरिकांनी अधिक सतर्क आणि दक्ष राहणे अपेक्षित आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe