Ambuja Cement Share Price : शेअर बाजारातील ग्राहकांसाठी विशेषता अंबुजा सिमेंट मध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी आहे. अंबुजा सिमेंटने व्यवसायिक वर्ष 2024 च्या तिसऱ्या तिमाहीचा स्टँडअलोन निकाल जाहीर केला आहे.
यात कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर (YoY) 514 कोटी वरून 1758 कोटी रुपये इतका झाला आहे, तसेच याची कमाई सुद्धा वाढली आहे. कंपनीच्या तिमाही निकालातील आकडेवारीनुसार, कंपनीची कमाई 4,422 कोटी वरून, 4,850 कोटी वरून वाढलीये.

तथापि, कंपनीच्या EBITDA मध्ये घट दिसून आली आहे, जी 833.6 कोटी वरून 407.4 कोटी पर्यंत खाली आलीये. EBITDA मार्जिन देखील 19% वरून 8.4% पर्यंत कमी झालाय.
पण नफ्यात मात्र मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, परंतु EBITDA आणि मार्जिनमधील घट हे दर्शविते की कंपनीला खर्च दबाव आणि इतर ऑपरेशनल आव्हानांचा सामना करावा लागला आहे.
दरम्यान आता आपण कंपनीचा तिमाही निकाल लागल्यानंतर अंबुजा सिमेंटचे शेअर्सची परिस्थिती कशी आहे? अंबुजा सिमेंटचे शेअर्स सध्या काय रेंजमध्ये ट्रेड करत आहेत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
तिमाही निकालाची आकडेवारी
प्रॉफिटेबिलिटीच्या आकडेवारीला सरकारी अनुदानातूनही मदत केली गेली आहे. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत सरकारी अनुदान हे केवळ 17 कोटी होते पण या तिमाही मध्ये हा आकडा 193 कोटींवर गेला आहे.
गेल्या वर्षी या कालावधीमध्ये कंपनीची कमाई ₹ 4,439 कोटी होती आता या तिमाही मध्ये कमाईत 13.6% ची वाढ झालीय अन हा आकडा 5,043 कोटींवर पोहचला आहे.
EBITDA अगोदर, अंबुजाची कमाई वार्षिक आधारावर 29 टक्क्यांनी घसरून ₹ 600 कोटीवर गेली आहे, तर एका वर्षाच्या तिमाहीत मार्जिन 19% टक्क्यांवरून 700 बेस पॉईंट्सनी घसरून 11.9 % इतके झाले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत कंपनीची स्टँडअलोन EBITDA 43% घसरून 595 रुपये झालीये.
तिमाही निकालाच्या घोषणेनंतर अंबुजा सिमेंटचे शेअर घसरलेत
अंबुजा सिमेंटचे तिमाही निकाल जाहीर झालेत आणि निकालाच्या घोषणेनंतर अंबुजा सिमेंटचे शेअर्स 2.5% घसरले आहेत. आता या कंपनीचा स्टॉक 0.9% कमी होऊन 538.3 रुपयांवर व्यापार करीत आहे. हा स्टॉक त्याच्या अलीकडील उच्चांकी 706 रुपयांपेक्षा 23% खाली आला आहे.













