271 दिवसांच्या FD वर मिळणार 7% व्याज ! ‘या’ बँकेने एफडी व्याजदरात सुधारणा केली

मुदत ठेव हा गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय मानला जातो. यामध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. दरम्यान, नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी अनेक खासगी आणि सरकारी बँकांनी एफडीवरील व्याजदरात बदल केले आहेत. या यादीत खासगी क्षेत्रातील फेडरल बँकेचाही समावेश करण्यात आला आहे.

Tejas B Shelar
Published:

Banking FD News : फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना देशातील बँका चांगला परतावा देत आहेत. मोठ्या बँकांच्या तुलनेत छोट्या स्मॉल फायनान्स बँका एफडीवर अधिकचा परतावा देतात. काही मोठ्या बँका सुद्धा आता गुंतवणूकदारांना फिक्स डिपॉझिट वर चांगला परतावा देत आहेत. मुदत ठेव हा गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय मानला जातो.

यामध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. दरम्यान, नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी अनेक खासगी आणि सरकारी बँकांनी एफडीवरील व्याजदरात बदल केले आहेत. या यादीत खासगी क्षेत्रातील फेडरल बँकेचाही समावेश करण्यात आला आहे.

बँकेने 3 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींसाठी नवीन व्याजदर प्रभावी केले आहेत. 16 डिसेंबर 2024 पासून ग्राहक त्याचा लाभ घेऊ शकतात. बँक 7 दिवस ते 5 वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीच्या कार्यकाळावर सर्वसामान्य नागरिकांना किमान 3% आणि कमाल 7.40 टक्के व्याज ऑफर करत आहे.

तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ही बँक किमान 3.50% आणि कमाल 7.90% व्याज देत आहे. बँक सर्व कार्यकाळांवर ज्येष्ठ नागरिकांना 0.50% अतिरिक्त व्याज देत आहे. अर्थातच सामान्य ग्राहकांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना अधिकचा परतावा मिळतो.

फेडरल बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, एक वर्षाच्या एफडीवर सामान्य लोकांना 7% व्याज मिळत आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना 1 वर्षाच्या FD वर 7.50% व्याज मिळत आहे. 5 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या FD वर, सामान्य नागरिकांना 6.60% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.25% व्याज मिळत आहे.

या बँकेकडून 777 दिवसांच्या आणि 50 महिन्यांच्या एफडीवर सर्वाधिक परतावा दिला जात आहे. या दोन्ही कालावधीच्या एफडीसाठी व्याजदर समान आहे. ही बँक या दोन्ही कालावधीच्या एफडीवर सर्वसामान्य नागरिकांना ७.४०% आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.९०% दराने परतावा ऑफर करत आहे.

फेडरल बँकेचे एफडीवरील व्याजदर

7 ते 29 दिवस – 3%
30 ते 45 दिवस – 3.50%
46 ते 180 दिवस- 5.50%
181 दिवस- 6.50%
182 दिवस ते 270 दिवस – 6.25%
271 दिवसांपासून 1 वर्षापेक्षा कमी – 6.50%
1 वर्ष- 7%
1 वर्षापेक्षा जास्त आणि 399 दिवसांपर्यंत – 7.25%
४०० दिवस- ७.३५%
401 दिवसांपासून ते 2 वर्षांपेक्षा कमी – 7.25%
2 वर्ष ते 776 दिवस – 7.15%
७७७ दिवस- ७.४०%
७७८ दिवस ते ३ वर्षांपेक्षा कमी – ७.१५%
3 वर्षापासून ते 50 महिन्यांपेक्षा कमी – 7.10%
५० महिने- ७.४०%
50 महिन्यांपेक्षा जास्त आणि 5 वर्षांपेक्षा कमी – 7.10%
5 वर्षे- 7.10%
5 वर्षांपेक्षा जास्त – 6.60%

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe