इंजिनिअर बनायचंय ? मग सिव्हिल, मेकॅनिकल सोडा ‘या’ ब्रांचमधून इंजिनिअरिंग करा, लाखो रुपयांच्या पगाराची नोकरीं मिळणार

तुम्हाला इंजिनीरिंगला ऍडमिशन घ्यायचे आहे का? मग आजची बातमी कामाची राहणार आहे. आज आपण इंजिनीरिंगच्या एका ब्रँचविषयी माहिती पाहणार आहोत.

Published on -

Best Engineering Branch : तारीख 5 मे 2025 या दिवशी महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. यानंतर 8 दिवसांनी 10वी चा निकाल जाहीर करण्यात आला. 13 मे 2025 रोजी SSC म्हणजे दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. दरम्यान, दहावी आणि 12वीच्या निकालानंतर आता विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी लगबग करत आहेत.

12वी नंतर अनेकजण इंजिनिअर बनण्याचे स्वप्न पाहतात आणि यासाठी देशातील सर्वोच्च इंजिनीरिंग कॉलेजला ऍडमिशन घेतात. दरवर्षी लाखो विद्यार्थी इंजिनीरिंगला ऍडमिशन घेतात, यातील बहुतांशी विद्यार्थी सिव्हिल, मेकॅनिकल अशा ब्रांचला ऍडमिशन घेतात.

पण आज आपण अशा एक इंजिनिअरिंगच्या ब्रांचविषयी माहिती पाहणार आहोत ज्याबाबत विद्यार्थ्यांना फारशी माहिती नाहीये. एयरोस्पेस इंजीनियरिंग ही इंजीनियरिंगची अशी एक ब्रांच आहे, ज्यातून डिग्री मिळवली म्हणजे तुमची लाईफ सेट होणार आहे.

जर तुम्हाला अवकाश, रॉकेट आणि उपग्रहांमध्ये अधिक रस असेल आणि या संबंधित तंत्रज्ञानाची सखोल समज असेल, तर तुम्ही या ब्रँचमधून इंजीनियरिंग करू शकता.

एरोस्पेस अभियांत्रिकी थोडी कठीण आहे, परंतु एकदा तुम्ही ही डिग्री मिळवली तर तुमचा पगार लाखोत नाही तर थेट कोटींमध्ये राहणार आहे. तुम्ही ही डिग्री मिळवून नासा, इस्रो आणि स्पेसएक्स सारख्या कंपन्यामध्ये उत्तम पॅकेजेची नोकरीं मिळवू शकता.

एयरोस्पेस इंजीनियरिंग काय आहे ?

जाणकार लोक म्हणतात की, एरोस्पेस इंजीनियरिंग ही अशा विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना तंत्रज्ञान, अवकाश आणि संशोधनाची आवड आहे. या ब्रँचचे एरोनॉटिकल आणि एस्ट्रोनॉटिकल हे दोन प्रकार पडतात. यातील एरोनॉटिकल हा प्रकार वातावरणात उडणाऱ्या वाहनांशी म्हणजे हेलिकॉप्टर आणि विमान अशाशी संबंधित आहे.

तसेच एस्ट्रोनॉटिकल हा प्रकार उपग्रह आणि रॉकेट सारख्या अवकाशात काम करणाऱ्या वाहनांशी संबंधित आहे. आता आपण या कोर्समध्ये काय काय शिकता येत? याची माहिती पाहुयात. या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना मैथ्स, फिजिक्स, फ्लूइड मैकेनिक्स, थर्मोडायनामिक्स आणि कंपोज़िट मटेरियल्स सारखी एडवांस्ड टेक्नोलॉजीचे धडे दिले जातात.

Aerospace इंजिनिर्सला काय पगार मिळतो

ऐरोस्पेस इंजिनिर्सला इतर इंजिनिअर्सपेक्षा जास्तीचा पगार मिळतो. या इंजिनिर्सला सुरवातीला 12-20 लाखाचा पगार मिळतो. जर तुम्ही बेस्ट कॉलेजमधून म्हणजे IIT आणि IIST सारख्या कॉलेजमधुन डिग्री घेतली तर तुम्हाला चांगला पगार मिळू शकतो. Boeing, Airbus, Lockheed Martin, आणि HAL अशा प्रायव्हेट कंपन्या तर अशा इंजिनिर्सला 40 ते 80 लाखांचा पगार देतात.

जर तुम्ही नासा किंवा स्पेसएक्स सारख्या जागतिक कंपन्यांमध्ये सामील झालात तर पगार 1 कोटींपेक्षा जास्त मिळू शकतो. इस्रो आणि डीआरडीओ सारख्या सरकारी संस्था देखील चांगला पगार देतात तसेच संशोधन आणि प्रकल्पांवर काम करण्याची संधी सुद्धा देतात.

Aerospace इंजीनियरिंगसाठी बेस्ट कॉलेज कोणते आहे?

Aerospace इंजीनियरिंगसाठी भारतातील बेस्ट कॉलेज कोणते ? Aerospace इंजीनियरिंग करायची असेल तर तुम्ही देशातील काही लोकप्रिय कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ शकता. आयआयटी बॉम्बे, आयआयटी कानपूर, आयआयटी मद्रास आणि आयआयएसटी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी) या महाविद्यालयांमध्ये तुम्ही हा कोर्स करू शकता.

पण या कॉलेजमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना जेईई अॅडव्हान्स्ड सारखी कठीण प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार अशी माहिती जाणकारांकडून देण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News