म्हाडाचे घर विकता येते का किंवा भाड्याने देता येते का? काय आहेत यासंबंधीचे नियम? वाचा माहिती

Ahmednagarlive24 office
Published:
mhada

महागाईच्या कालावधीमध्ये स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करणे हे खूप कठीण काम आहे. कारण घर आणि जागांच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला घराचे स्वप्न पूर्ण करणे शक्य होत नाही. त्यामुळे बँकांच्या माध्यमातून गृहकर्ज घेऊन घराचे स्वप्न पूर्ण केले जाते.

दुसरे म्हणजे सरकारच्या म्हाडा आणि सिडको सारख्या गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून मुंबई आणि तर मोठ्या शहरांमध्ये घरांसाठी सोडत काढण्यात येते व या माध्यमातून देखील घराचे स्वप्न बऱ्याच जणांचे पूर्ण होते. परंतु अशा पद्धतीने म्हाडा सारख्या गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून घर मिळाले तर तुम्ही ते घर भाड्याने देऊ शकतात का किंवा ते विकू शकतात का ? असेही प्रश्न अनेकदा तुमहाला पडला असेल.परंतु याबाबत म्हाडाच्या माध्यमातून काही नियम आहेत व या नियमांचे पालन करणे गरजेचे असते.

म्हाडाच्या माध्यमातून मिळालेले घर विकता येते का किंवा भाड्याने देता येते का?

म्हाडाच्या माध्यमातून मिळालेले घर विकण्याचे नियम

जर आपण यामध्ये नियम बघितले तर जेव्हा तुम्हाला म्हाडाचे घर मिळते तेव्हा नियमानुसार घर मिळाल्यापासून पाच वर्षापर्यंत ते घर तुम्हाला विकता येत नाही. पाच वर्षांमध्ये हे घर जर तुम्ही विकण्याचा प्रयत्न केला तर घराची नोंदणी किंवा त्या घराच्या नावावर नोंदणी होत नाही. यामध्ये अशा पद्धतीने घर विकण्याकरिता तुम्हाला म्हाडाकडून एनओसी घ्यावी लागेल. ज्या दिवशी तुम्हाला घराचा ताबा मिळतो त्या तारखेपासून पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतरच अशा पद्धतीची एनओसी तुम्हाला म्हाडाकडून मिळू शकते. त्यामुळे घर मिळाल्यानंतर पाच वर्ष जेव्हा पूर्ण होतील तेव्हा तुम्ही घर विकण्याचा विचार करू शकतात.

म्हाडाचे घर भाड्याने देऊ शकतात का ?

म्हाडाच्या माध्यमातून मिळालेले घर भाड्याने देण्याच्या संबंधी दोन वर्षापासून काही नियम व अटी म्हाडाने घालून दिल्या आहेत. त्यामुळे या अटी व शर्तींच्या अधीन राहून तुम्हाला म्हाडा घर भाड्याने देण्यासाठी विचार करून घेते. समजा तुम्हाला म्हाडाच्या लॉटरीमध्ये घर मिळाले व तुम्ही लगेचच त्याला भाड्याने देऊ इच्छित असाल तर मात्र त्यासाठी तुम्हाला म्हाडाकडे अर्ज सादर करावा लागतो. त्या अर्जामध्ये तुमच्या घराची संपूर्ण माहिती द्यावी लागते व घर तुम्हाला भाड्याने का द्यायचे आहे? याचा संपूर्ण तपशील नमूद करावा लागतो.

काही ठोस कारणांमुळे तुम्ही त्या ठिकाणी राहू शकणार नाहीत असे अर्जाच्या माध्यमातून तुम्हाला म्हाडाला पटवून द्यावे लागते. त्यानंतर तुमचे हे पत्र तुम्हाला एनओसी साठी म्हाडाकडे जमा करावे लागते. याकरिता आवश्यक असलेली एनओसी मिळवण्याकरिता एक वर्षासाठी म्हाडाला तीन हजार ते पाच हजार रुपये तुम्हाला भरावे लागतात व तुमच्या भाडेकरू बद्दल कळवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला याबाबतची एनओसी दिली जाते.

या पद्धतीचा अर्ज कसा करावा ?

अशा प्रकारचा अर्ज करून तुम्ही एनओसी घेऊ शकतात व ही प्रक्रिया एक वर्षासाठी असते. एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल आणि एक वर्षाची फी भरावी लागते. प्रत्येक वर्षाला ही प्रक्रिया करणे शक्य नसेल तर तुम्ही तीन वर्षांसाठी एनओसी मिळवू शकतात. परंतु याकरिता तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतात. त्यासाठी लागणारा पैशांचा विचार केला तर एक वर्षासाठी ईडब्ल्यूएस घरांसाठी दोन हजार रुपये, एलआयसी घरांसाठी तीन हजार, एमआयजी घरांसाठी चार आणि एचआयजी घरांसाठी पाच हजार रुपये भरावे लागतात. जेव्हा तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण करता तेव्हा तुम्ही घर भाड्याने देऊ शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe