Course After 12th : बारावी नंतर काय करावे असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी खास राहणार आहे. आज आपण बारावीनंतर केल्या जाणाऱ्या दोन कोर्सची तुलना करणार आहोत. खरे तर आपल्याकडे बारावीनंतर एमबीबीएस तसेच इंजीनियरिंग ला ऍडमिशन घेणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे.
अनेकांचे डॉक्टर, इंजिनिअर बनण्याचे स्वप्न आहे. पण फक्त डॉक्टर आणि इंजिनियर हे दोनच पर्याय करियर बनवू शकतात हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. कारण की बारावीनंतर असेही काही कोर्सेस केले जाऊ शकतात ज्यानंतर विद्यार्थ्यांची लाईफ सेट होऊ शकते.

दरम्यान आज आपण अशाच दोन कोर्सेस ची माहिती पाहणार आहोत. आज आपण हॉटेल मॅनेजमेंट आणि BBA या दोन्ही कोर्सेसची तुलना करणार आहोत.
हॉटेल मॅनेजमेंट
हॉटेल मॅनेजमेंट हा एक असा कोर्स आहे जो की 10+2 नंतर करता येतो. बारावी उत्तीर्ण विद्यार्थी या कोर्सला ऍडमिशन घेऊ शकतात. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना हॉटेल, रिसॉर्ट्स, फूड चेन, पर्यटन आणि हॉस्पिटैलिटी म्हणजेच पाहुणचार संबंधित प्रशिक्षण दिले जाते.
यात स्वयंपाकघर व्यवस्थापन, अन्न आणि पेये सेवा, फ्रंट ऑफिस, हाऊसकीपिंग, अतिथी हाताळणी यासारख्या विषयांवर लक्ष केंद्रित केले जाते. कोणत्याही स्ट्रीम मधून बारावी उत्तीर्ण विद्यार्थी या कोर्सला ऍडमिशन घेऊ शकतात.
हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स हा जनरली तीन ते चार वर्षांचा असतो. हा कोर्स केल्यानंतर विद्यार्थ्यांना हॉटेल/रेस्टॉरंट मॅनेजर, शेफ, फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्ह, एअरलाइन्स/क्रूझ/ट्रॅव्हल कंपनी, केटरिंग आणि इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये करिअर घडवता येते.
हॉटेल मॅनेजमेंट केल्यानंतर विद्यार्थ्यांना अडीच लाखांपासून ते चार लाख रुपयांपर्यंतच्या पॅकेजची नोकरी लागू शकते. एक्सप्रेस घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना सहा ते दहा लाख रुपयांच्या पॅकेजची नोकरी सहज मिळू शकते.
कसा आहे BBA कोर्स
बीबीए (बॅचलर ऑफ बिझिनेस अॅडमिनिस्ट्रेशन) हा देखील एक लोकप्रिय अभ्यासक्रम आहे. हा एक सामान्य व्यवस्थापन कोर्स आहे आणि विद्यार्थ्यांना वित्त, विपणन, एचआर, ऑपरेशन्स, आंतरराष्ट्रीय व्यवसाय यासारख्या विषय शिकवले जातात.
हा कोर्स त्यांना कॉर्पोरेट क्षेत्रासाठी तयार करतो. कोणत्याही स्ट्रीम मधून बारावी उत्तीर्ण विद्यार्थी या कोर्सला ऍडमिशन घेऊ शकतात मात्र विद्यार्थ्यांना बारावीच्या वर्गात किमान 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन हा एक तीन वर्षांचा कोर्स आहे. बीबीए केल्यानंतर विद्यार्थ्यांना एमबीएला सुद्धा जाता येते. बीबीए केल्यानंतर विद्यार्थ्यांना विपणन कार्यकारी, एचआर सहाय्यक, बँकिंग आणि वित्त क्षेत्र, स्टार्टअप/व्यवसाय विश्लेषक म्हणून करिअर बनवता येते.
बीबीए पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना तीन ते पाच लाख रुपयांची नोकरी लागू शकते. तसेच अनुभवानंतर सात ते बारा लाख रुपयांपर्यंतची नोकरी मिळू शकते. एम बी ए केल्यानंतर या विद्यार्थ्यांना अधिक स्कोप मिळतो.