Success story : असाध्य ते सध्या करिता सायास..अशी एक म्हण आपल्याकडे आहे. प्रयत्न, कष्ट, योग्य नियोजन आदींमुळे माणूस नक्कीच यशस्वी होतो. याचीच एक प्रचिती महिलेले दिली आहे. एक स्त्री.. शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनेक कंपन्यांत भटकली..
परंतु फर्श्र म्हणून कुणीच जॉब देईना..अन मग एक आयडिया आली व जिद्दीच्या जोरावर उभी केली ८०० कोटींची कंपनी !!! या महिलेचं नाव आहे पूनम गुप्ता. आज त्यांची पीजी पेपर्स नावाची कंपनी उभी असून अनेक देशांत त्यांचा व्यवहार पसरलेला आहे. चला जाणून घेऊयात त्यांची सक्सेस स्टोरी…
* पूनम गुप्ता यांचा अल्प परिचय
पूनम गुप्ता यांचा जन्म नवी दिल्ली येथे झाला. पूनमने दिल्लीच्या लेडी श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून अर्थशास्त्रात ऑनर्स पदवी मिळवली आहे. तसेच त्यांनी एमबीए देखील केलं आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनेक ठिकाणी नोकरीसाठी जाऊन आल्या परंतु अनुभव नसल्याच्या कारणांतून त्यांना वारंवार रिजेक्ट केले. याच दरम्यान त्यांचा विवाह स्कॉटलंडमध्ये असणाऱ्या भारतीय वंशाचे फार्मासिस्ट असलेल्या पुनीत यांच्यासोबत तिचा विवाह झाला.
* नशिबाची साथ व जिद्द
लग्नानंतर पूनम या स्कॉटलंडला गेल्या. पण येथेही याना नशिबाने साथ दिली नाही. त्यांना येथेही साक्री मिळाली नाही. अनुभव नसल्याचे कारण देत त्यांचे अर्ज सातत्याने फेटाळले गेले. परंतु हे करत असतानाच त्यांच्या डोक्यात एक बिझनेस आयडिया आली.
त्या जेव्हा इंटरव्ह्यू साठी वेगवेगळ्या कार्यालयांना भेट देत तेव्हा त्यांना तेथे जवळपास प्रत्येक कार्यालयात रद्दी मोठा ढीग दिसत असे. यातूनच जन्माला आली नवी बिझनेस आयडिया.
* उभी राहिली कंपनी
या रद्दीकडे पाहून पूनम याना ही रद्दी रिसायकल करण्याचा विचार मनात आला. यानंतर त्यांनी यावर बरेच संशोधन केले. या काळात पूनमला सरकारी योजनेंतर्गत एक लाख रुपयांचे फंडिंग मिळाले. 2003 मध्ये त्यांनी पीजी पेपर्स नावाची एक कंपनी सुरू केली.
यामध्ये त्या टाकाऊ कागदाचा पुनर्वापर करून नवीन उत्तम दर्जाचा कागद तयार करू लागल्या. पाहता पाहता पूनम यांचा व्यवसाय प्रचंड वाढला. आज पूनम यांचा व्यवसाय भारतासह 60 देशांमध्ये पसरला असून साधारण 800 कोटी रुपयांची त्यांची उलाढाल असते. अशा पद्धतीने ज्या महिलेस अनुभव नाही असे म्हणून कामावर कुणी घेत नव्हते त्याच पूनम गुप्ता यांनी 800 कोटींची कंपनी उभी केली.