खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! EPFO पेन्शनच्याबाबत लवकरच ‘हा’ निर्णय घेणार

प्रायव्हेट सेक्टर मधील कर्मचाऱ्यांसाठी एक गुड न्यूज समोर येत आहे. प्रायव्हेट सेक्टर मधील कर्मचाऱ्यांची किमान पेन्शन पुन्हा एकदा वाढवली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे तब्बल 11 वर्षानंतर असा निर्णय होणार असून या निर्णयाचा देशातील असंख्य खाजगी कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

Published on -

EPFO News : प्रायव्हेट सेक्टर मधील कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी प्रायव्हेट सेक्टर मधील कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भात आहे. खरेतर सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच प्रायव्हेट सेक्टरमधील कर्मचाऱ्यांना वेगवेगळे लाभ मिळत असतात. यामध्ये पेन्शनच्या लाभाचा सुद्धा समावेश होतो.

दरम्यान देशातील EPFO कर्मचाऱ्यांसाठी म्हणजेच प्रायव्हेट सेक्टर मधील कर्मचाऱ्यांसाठी लवकरच एक मोठी गुड न्यूज मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार ईपीएफओ कर्मचाऱ्यांची पेन्शनची रक्कम पुन्हा एकदा वाढवली जाणार आहे.

एका महत्त्वाच्या संसदीय समितीने अशी शिफारस केली असून यामुळे देशातील लाखो प्रायव्हेट सेक्टरमधील कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान आता आपण या शिफारशीनुसार प्रायव्हेट सेक्टर मधील कर्मचाऱ्यांची पेन्शनची रक्कम नेमकी किती वाढणार, संसदीय समितीने नेमकी काय शिफारस केली आहे याबाबतचा आढावा घेणार आहोत.

किती वाढणार पेन्शन?

मिळालेल्या माहितीनुसार एका संसदीय समितीने प्रायव्हेट सेक्टर मधील कर्मचाऱ्यांची किमान पेन्शन 7500 इतकी झाली पाहिजे अशी मागणी केलेली होती. दरम्यान आता संसदीय समितीच्या याच मागणीवर सकारात्मक असा निर्णय घेतला जाईल अशी माहिती समोर येत आहे.

या मागणीचा गांभीर्याने विचार करत केंद्रातील मोदी सरकार खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची किमान पेन्शन 7500 रुपये इतकी करणार आहे. जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे 2014 मध्ये केंद्रातील सरकारकडून ईपीएफओ कर्मचाऱ्यांची किमान पेन्शन अडीचशे रुपयांवरून वाढवण्यात आली होती.

त्यावेळी ईपीएफओ कर्मचाऱ्यांची किमान मासिक पेन्शन अडीचशे रुपयांवरून एक हजार रुपये एवढी करण्यात आली. मात्र गेल्या एका दशकाहून अधिक काळात ईपीएफओ कर्मचाऱ्यांच्या किमान मासिक पेन्शन मध्ये कोणतीच वाढ झालेली नाही.

अकरा वर्षांपासून पेन्शनमध्ये वाढ झालेली नसल्याने आता खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची पेन्शन वाढवली गेली पाहिजे अशी मागणी ट्रेड युनियन आणि पेन्शन धारकांकडून उपस्थित करण्यात आली होती,

तसेच एका महत्त्वाच्या संसदीय समितीने सुद्धा खाजगी कर्मचाऱ्यांची किमान पेन्शन वाढवण्याची मागणी केली होती आणि आता याच मागणीवर सरकार सुद्धा सकारात्मक निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. किमान पेन्शन 1000 रुपयांवरून 7500 होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पेन्शनसाठी किती रक्कम कापली जाते ?

मिळालेल्या माहितीनुसार ईपीएफओच्या माध्यमातून खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पगारातून बेसिक पगारातील 12 टक्के एवढी रक्कम कपात केली जाते. ईपीएफओच्या खात्यात कर्मचाऱ्यांच्या हिश्याची जेवढी रक्कम कापली जाते तेवढीच रक्कम कंपनीकडून सुद्धा ईपीएफओ मध्ये टाकली जाते. दरम्यान, यातील 8.33 टक्के रक्कम कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळावी म्हणून ईपीएसमध्ये जमा केली जाते. तर 3.67 टक्के रक्कम ईपीएफमध्ये जमा केली जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News