Agri Business : चिंच उत्पादनातून शेतकरी होणार मालमाल ! पण यंदा भाव काय मिळणार ?

Ahmednagarlive24 office
Published:
Agri Business

Agri Business : यावर्षी खरिपात अल्पसा पाऊस झाला होता, त्यानंतर चार दिवस परतीचा भरमसाठ पाऊस झाल्याने चिंच बहरली असून, सर्वत्र चिंचेच्या झाडाला चिंचा लगडलेल्या दिसत आहेत. चिंचेच्या उत्पादनातून यंदा शेतकऱ्यांना चांगला आर्थिक हातभार लागणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या चार वर्षांपासून सुगी हातची जात आहे, त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडत आहे. दरवर्षी शेती दगा देत असल्याने शेतकरी दुग्ध व्यवसाय, कुक्कुट पालन, शेळी-मेंढी पालन करत आहेत तर काही शेतकरी भाजीपाला, फळबागा लागवड करतात, अनेक शेतकरी हे अल्पशा पावसावर येत असलेल्या नैसार्गिक चिचेतून चांगले आर्थिक उत्पन मिळवत आहेत.

बहुतांशी शेतकऱ्यांच्या शेतात नैसर्गिक रीत्या उगवलेली गावरान चिंचेची पुरातन झाडे आहेत. चिंच ही सपाट जमिनीवर, शेताच्या बांधावर, डोंगरदऱ्यात, माळरानावर, रस्त्याच्या दुतर्फा बहुसंख्येने चिंचेची झाडे असतात.

बिना खर्च चिंच वृक्षापासून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. यंदा चिचेच्या वृक्षांना पोषक वातावरण असल्याने सर्वत्र चिंचेच्या झाडांना चिंचा दिसत आहेत. मृगाचा पाऊस झाल्यापासून चिंच मोहराने बहरून गेली होती.

त्यामुळे यावर्षी चिचेतून चांगला आर्थिक हातभार मिळेल, अशी शेतर्कयांना अपेक्षा आहे. चिंचेच्या झाडांना विहिरी, बोअरच्या पाण्याची आवश्यता नसून, फवारणी करण्याची गरज भासत नाही. ते पावसाच्या पाण्यावर येते.

इतर फळझाडां प्रमाणे त्यावर कोणताही खर्च करावा लागत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना विनाखर्च उत्पन्न मिळते. यंदा अल्पशा पावसावरदेखील चिंचेच्या झाडांना भरपूर फळधारणा झालेली असल्यामुळे यंदा जास्त फायदा होईल, अशी आशा आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe