एफडीमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांसाठी गुड न्यूज ! ‘या’ बँकेने लॉन्च केली नवीन 400 दिवसांची एफडी योजना, नवीन योजनेचे स्वरूप आणि परतावा किती मिळणार ?

बँक ऑफ बडोदा ने एक नवीन एफडी योजना लॉन्च केली आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बँक ऑफ बडोदाने एक नवीन फिक्स डिपॉझिट योजना जाहीर केली आहे. बँकेने BOB उत्सव ठेव योजना नावाची एक नवीन स्कीम सुरू केली आहे. ही बँकेची उत्सव FD योजना 400 दिवसांची राहणार आहे.

Published on -

FD News : बँक ऑफ बडोदा ही देशातील एक प्रमुख सरकारी बँक आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देते. सोबतच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना अधिकचा परतावा देते. अशातच फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी आत्ताची एक मोठी बातमी समोर येत आहे.

मिळालेले माहितीनुसार बँक ऑफ बडोदा ने एक नवीन एफडी योजना लॉन्च केली आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बँक ऑफ बडोदाने एक नवीन फिक्स डिपॉझिट योजना जाहीर केली आहे. बँकेने BOB उत्सव ठेव योजना नावाची एक नवीन स्कीम सुरू केली आहे.

ही बँकेची उत्सव FD योजना 400 दिवसांची राहणार आहे. या योजनेंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना ७.३०%, ज्येष्ठ नागरिकांना ७.८०% आणि अति ज्येष्ठ नागरिकांना ७.९०% व्याज मिळणार आहे.

नक्कीच या फिक्स डिपॉझिट योजनेत जर ग्राहकांनी गुंतवणूक केली तर त्यांना चांगले रिटर्न मिळणार आहेत. बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांसाठी सात दिवसांपासून ते दहा वर्ष कालावधीची एफडी ऑफर करत आहे.

या वेगवेगळ्या कालावधीच्या एफडी साठी बँकेकडून वेगवेगळे व्याजदर लागू करण्यात आले आहेत. बँक ऑफ बडोदा सामान्य ग्राहकांना विविध कालावधीच्या एफडीवर 4.25 टक्क्यांपासून ते 7.15 टक्क्यांपर्यंतचे व्याज ऑफर करते.

सिनिअर सिटीजन ग्राहकांसाठी मात्र बँक 4.75 टक्क्यांपासून ते 7.65 टक्क्यांपर्यंतचे व्याज ऑफर करते. बँक ऑफ बडोदा एक वर्ष पासून ते चारशे दिवस कालावधीच्या एफडीवर सर्वसामान्य ग्राहकांना 7% आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 7.50% या दराने व्याज देत आहे.

मात्र आता बँकेने चारशे दिवसांची नवीन एफटी योजना लॉन्च केली असून यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना यापेक्षा अधिक परतावा मिळतोय.

यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना ७.३०%, ज्येष्ठ नागरिकांना ७.८०% आणि अति ज्येष्ठ नागरिकांना ७.९०% व्याज मिळणार आहे. अर्थातच ही विशेष एफडी योजना बँक ऑफ बडोदाची सर्वाधिक व्याज परतावा देणारी योजना बनली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe