365 दिवसाच्या FD वर मिळणार जबरदस्त परतावा, ‘या’ 5 सरकारी बँका देताय भरपूर व्याज

FD News : पैशांची बचत करण्यास सुरुवात करण्यासाठी दिवाळी हा उत्तम काळ आहे. दिवाळीच्या काळात नवीन कार्याची सुरुवात होते. या काळात अनेक वित्तीय कंपन्या आणि बँका अनेक ऑफर आणतात. FD अर्थातच फिक्स डिपॉझिटवरही विविध बँकांच्या माध्यमातून चांगले व्याज दिले जात आहे.

मुदत ठेव हा पैशांच्या बचतीसाठी एक चांगला पर्याय असतो. फिक्स डिपॉझिट मध्ये केलेली गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित असते. यात एकदा पैसे जमा करून तुम्ही चांगला फंड तयार करू शकता.

जर तुम्हाला कमी काळासाठी गुंतवणूक करायची नसेल, तर एक वर्षाची एफडी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. सार्वजनिक क्षेत्रातील अनेक बँका आहेत ज्या एका वर्षाच्या ठेवींवर ७% पेक्षा जास्त व्याज देत आहेत.

सरकारी बँकेतील एफडी ही केवळ बचतच नाही तर सुरक्षित गुंतवणूकही ठरू शकते. दरम्यान आता आपण देशातील कोणत्या बँका एक वर्ष कालावधीच्या एफडीवर सर्वाधिक व्याज देत आहेत याविषयी माहिती पाहणार आहोत.

कॅनरा बँक : कॅनडा बँक आपल्या ग्राहकांना फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला परतावा देत आहे. ही बँक सामान्य नागरिकांना ६.८५% आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.३५% व्याज देत आहे.

पंजाब नॅशनल बँक : सामान्य नागरिकांना ६.८०% आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.३५% व्याज देत आहे.

बँक ऑफ इंडिया : सर्वसामान्य नागरिकांना ६.८०% आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.२५% व्याज देत आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया : सामान्य नागरिकांना ६.८५% आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.३५% व्याज एक वर्ष ते २ वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी देत ​​आहे.

युनियन बँक ऑफ इंडिया : सामान्य नागरिकांना 6.80% आणि ज्येष्ठ नागरिकांना एक वर्षाच्या FD वर 7.30% व्याज देत आहे.

SBI : स्टेट बँक ऑफ इंडिया 1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी सध्या सामान्य नागरिकांना 6.80% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.30% दराने व्याज ऑफर करत आहे.