पुन्हा भीती सुनामीची ! महासुनामी येणार ! चार लाख नागरिकांचा मृत्यू होण्याची शक्यता

Published on -

Marathi News : यापूर्वी जगभरात आलेल्या सुनामीने मोठ्या प्रमाणात विनाश घडवून आणलेला आहे. २०२३ हे वर्ष तर कोरोनामुळे झालेले नुकसान भरून काढण्यातच निघून गेले आहे.

नवीन वर्ष तर चांगले असेल असे वाटत असतानाच सोशल मीडियावर पुढील वर्षी होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीच्या बातम्यांनी सर्वांच्या मनात भीती निर्माण केली आहे.

नुकत्याच एका शास्त्रज्ञांच्या नवीन शोधात अमेरिकेच्या वॉशिंग्टनजवळील कॅनाडाच्या व्हॅन्कूव्हर आयसलँडमध्ये लवकरच महासुनामी येणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अभ्यासातून भीतीदायक माहिती समोर आली आहे. या महासुनामीमध्ये जवळपास चार लाख नागरिकांचा मृत्यू होणार असल्याचे सांगितले जात आहे. कॅनडातील व्हॅन्कूव्हर आयलंडमधील टेक्टोनिक प्लेट्समधील टक्करीमुळे सुनामी निर्माण होऊ शकते.

विशेष बाब म्हणजे यापूर्वीही या भागात अशा प्रकारीची सुनामी आलेली आहे. त्यावेळी प्रलयात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तज्ज्ञांनुसार येथे जर सुनामी आली तर जवळपास चार लाख नागरिकांचा यात मृत्यू होऊ शकतो.

या फॉल्ट लाइनला XEOLXELEK-EIK Lake फॉल्ट (XELF) असे नाव देण्यात आले आहे. ही फॉल्ट लाईन ४५ मैल पसरलेली आहे. कॅनडाशिवाय ही सुनामी सिएटलमध्येही विनाश घडवू शकते. या भागात ६.१ ते ७.६ तीव्रतेचा भूकंप झाला तरच सुनामीची आपत्ती येऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe