Fixed Deposit Interest Rate : 7 फेब्रुवारी 2025 रोजी रिझर्व बँक ऑफ इंडियाने तब्बल पाच वर्षानंतर एक मोठा निर्णय घेतला. सर्वसामान्यांना दिलासा मिळावा म्हणून आरबीआयने रेपो रेट मध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंत रेपो रेट 6.50% इतका होता मात्र यामध्ये आरबीआय ने 0.25 टक्क्यांची कपात केली असून यामुळे हा रेट 6.25 टक्के एवढा झाला आहे.
आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की पाच वर्षांनी पहिल्यांदाच आरबीआयने रेपो रेट मध्ये कपात केली आहे. दोन वर्षांपूर्वी आरबीआय ने रेपो रेटमध्ये बदल केला होता त्यावेळी आरबीआयने रेपो रेट वाढवले होते.
![Fixed Deposit Interest Rate](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/Fixed-Deposit-Interest-Rate.jpeg)
मात्र दोन वर्षांपासून आरबीआयने रेपो रेट मध्ये कुठलाच बदल केलेला नसून हे दर गेल्या अनेक महिन्यांपासून स्थिर असल्याने हे दर कमी झाले पाहिजेत अशी मागणी सर्वसामान्यांकडून आणि उद्योग जगतांकडून होत होती.
अखेर कार आरबीआयने रेपो रेटमध्ये कपात केली असून याचा परिणाम म्हणून आता गृह कर्जासहित सर्व प्रकारचे कर्ज स्वस्त होणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना याचा नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे यात शंकाच नाही.
मात्र रेपो रेट मध्ये कपास झाली असल्याने आता फिक्स डिपॉझिट वर लागू असणाऱ्या व्याजदरात देखील कपात होणार आहे. अर्थातच फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना आरबीआयच्या या निर्णयाचा फटका बसणार आहे.
पण आरबीआय ने हा निर्णय घेतल्यानंतर अजून पर्यंत देशातील कोणत्याच बँकेने फिक्स डिपॉझिट वरील व्याजदर कमी केलेले नाही. यामुळे जोपर्यंत बँकेचे व्याजदर कमी होत नाही तोपर्यंत गुंतवणूकदारांनी लवकरात लवकर फिक्स डिपॉझिटमध्ये पैसा गुंतवून द्यावा असे आव्हान जाणकारांकडून केले जात आहे.
ज्यांना एफडी करायची असेल त्यांनी व्याजदर कमी होण्याआधी एफडी करून घ्यावी असे म्हटले जात आहे. दरम्यान आता आपण देशातील टॉप 5 अशा बँकांची माहिती पाहणार आहोत ज्या आपल्या ग्राहकांना एफडी साठी सर्वाधिक व्याज ऑफर करत आहेत.
या बँका देतात सर्वाधिक व्याज
युनिटी स्मॉल फायनान्स बँक : ही स्मॉल फायनान्स बँक 1001 दिवसांच्या फिक्स डिपॉझिट वर आपल्या ग्राहकांना 9% दराने व्याज देते. ही देशातील सर्वाधिक व्याजदर ऑफर करणारी बँक आहे.
सिटी युनियन बँक : या यादीत सिटी युनियन बँकेचा दुसरा क्रमांक लागतो आणि ही बँक 333 दिवसांच्या एफडीवर आपल्या ग्राहकांना 7.50% दराने परतावा देत आहे.
आयसीआयसीआय बँक : देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी प्रायव्हेट बँक म्हणजेच आयसीआयसीआय बँक आपल्या ग्राहकांना पंधरा महिन्यांपासून ते दोन वर्षे कालावधीच्या एफडीवर 7.25 टक्के दराने परतावा देत आहे.
इंडसइंड बँक : एक वर्ष पाच महिने ते एक वर्ष सहा महिने या कालावधीच्या एफडीवर इंडसइंड बँकेकडून 7.99% दराने व्याज दिले जात आहे.
RBL Bank : ही बँक आपल्या ग्राहकांना 500 दिवसांच्या एफडीवर सर्वाधिक व्याज देते. बँकेकडून या कालावधीच्या एफडीवर ग्राहकांना आठ टक्के दराने परतावा दिला जात असल्याची माहिती समोर आली आहे.