GK Marathi : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. आणि जर यां उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अचानक हवामान बदलले, तर सर्वांनाच आनंद होतो. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने नवीन विक्रम तयार केले आहेत. अनेक ठिकाणी तापमान 40°c पेक्षा अधिक आहे.
अशा परिस्थितीत जर हवामानात अचानक बदल झाला पावसाळी वातावरण तयार झाले तर वाढत्या तापमानापासून थोडासा दिलासा मिळतो आणि यामुळे साऱ्यांनाच आनंद होतो. दरम्यान आता लवकरच पावसाळ्याला सुरुवात होणार आहे. पावसाळ्यात आपल्याला अनेक मनमोहक दृश्य पाहायला मिळतात.

आकाशात पसरलेले काळे ढग, हलकीशी सरी आणि त्यातून झळकणारे सप्तरंगीं इंद्रधनुष्य हे दृश्य तर मनाला पुरते भारावून टाकणारे असते. आकाशात सप्तरंगी इंद्रधनुष्य पाहण्याची मजा खरंच काही और असते.
पण तुम्ही आकाशात इंद्रधनुष्य नेमका कसा तयार होतो याबाबत कधी विचार केला आहे का? खरेतर या सौंदर्यामागे विज्ञानाचे एक सुंदर सत्य लपलेले असते.
कसा तयार होतो सप्तरंगी इंद्रधनुष्य?
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, सूर्यप्रकाश जेव्हा पावसाच्या बारीक थेंबांमधून जातो, तेव्हा तो अपवर्तन आणि परावर्तनाच्या प्रक्रियेतून विविध रंगांमध्ये विभागला जातो आणि मग सप्तरंगी इंद्रधनुष्य आपल्याला पाहायला मिळतो.
अशावेळी पाण्याचे थेंब प्रिझमसारखे काम करत असल्यामुळे प्रकाश वेगवेगळ्या कोनांत वळतो आणि रंग तयार होतात आणि एकंदरीत याच प्रक्रियेमुळे आकाशात इंद्रधनुष्य तयार होते. अशी माहिती जाणकारांनी दिली आहे.
पण मंडळी तुम्ही आकाशात इंद्रधनुष्य पाहिला असला तरी इंद्रधनुष्याचे सात रंग कोणत्या क्रमाने असतात याची तुम्हाला माहिती आहे का? नाही ना मग आता आपण इंद्रधनुष्याच्या सातही रंगांचा क्रम थोडक्यात जाणून घेणार आहोत.
इंद्रधनुष्याच्या सातही रंगांचा क्रम कसा असतो
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, इंद्रधनुष्य हे सात रंगांनी बनलेले असते, म्हणून याला सप्तरंगी इंद्रधनुष्य म्हणतात. सप्तरंगी इंद्रधनुष्यात लाल, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, जांभळा आणि गडद निळा हे रंग असतात.
हे सर्व रंग एक विशिष्ट क्रमाने धनुष्यासारख्या आकारात दिसतात. त्यामुळे याला इंद्रधनुष्य म्हणतात. पण सप्तरंगी इंद्रधनुष्यातील रंगांचा क्रम कसा असतो तर हा क्रम Violet, Indigo, Blue, Green, Yellow, Orange, Red असा असतो.
इंद्रधनुष्यात तांबडा रंग बाहेरच्या बाजूस व आतील बाजूस क्रमाने नारिंगी, पिवळा, हिरवा, निळा, गडद निळा व जांभळा हे रंग दिसतात. म्हणून इंद्रधनुष्यातील रंगाचा क्रम दर्शवण्यासाठी VIBGYOR हा शब्द नेहमीच वापरला जात असतो.