महाराष्ट्रातील ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना 24 हजाराचा दिवाळी बोनस ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

ऐन दसऱ्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी या समुद्र अनुदानाची घोषणा केली असल्याने या संबंधित नोकरदार मंडळीचा दसरा आणि दिवाळीचा सण गोड होईल अशी आशा व्यक्त होत आहे.

Tejas B Shelar
Published:
Government Employee News

Government Employee News : आज नवरात्र उत्सवाची सांगता झाली आहे. आज संपूर्ण देशात विजयादशमी अर्थातच दसऱ्याचा मोठा पावन पर्व साजरा केला जात आहे. दरम्यान दसऱ्याच्या याच पावन पर्वावर महाराष्ट्र राज्यातील काही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे महापालिका अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना 24 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची मोठी घोषणा केली आहे.

ऐन दसऱ्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी या समुद्र अनुदानाची घोषणा केली असल्याने या संबंधित नोकरदार मंडळीचा दसरा आणि दिवाळीचा सण गोड होईल अशी आशा व्यक्त होत आहे.

दरम्यान ठाणे महापालिका अंतर्गत कार्यरत असणाऱ्या संबंधित नोकरदार मंडळीच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले जात आहेत.

या निर्णयामुळे सध्या या नोकरदार मंडळींमध्ये मोठे आनंदाचे वातावरण आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर या संबंधित कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान म्हणून 24 हजार रुपयांचा बोनस मिळणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की गेल्या वर्षी हा दिवाळी बोनस 21500 एवढा होता. मात्र यावेळी यामध्ये तब्बल अडीच हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

नक्कीच ठाणे महापालिकेने घेतलेल्या या निर्णयामुळे पालिका अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची यंदाची दिवाळी मोठ्या आनंदात आणि उत्साहात संपन्न होणार आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीचा बोनस मिळणार असल्याने सदर नोकरदार मंडळी सध्या मोठ्या उत्साहात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

ठाणे महापालिका प्रमाणेच राज्यातील इतरही महापालिका कर्मचाऱ्यांसाठी बोनसची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय, रेल्वे विभागाने देखील रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी नुकत्याच काही दिवसांपूर्वी बोनसची घोषणा केली होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe