मोठी बातमी ! ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 29 हजार रुपयांचा बोनस, आचारसंहितेच्या आधीच घेतला मोठा निर्णय, वाचा डिटेल्स

यावेळी या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बोनसच्या रकमेत तब्बल 3000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गेल्यावर्षी अर्थातच 2023 मध्ये दिवाळी बोनस म्हणून मुंबई महापालिका अंतर्गत कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना 26,000 रुपयांचा बोनस दिला गेला होता.

Published on -

Government Employee News : काल दिनांक 14 ऑक्टोबर 2024 ला, आज विधानसभा निवडणूकांची घोषणा होणार असल्याने एक महत्त्वाची राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत शिंदे सरकारने अनेक मोठ-मोठे निर्णय घेतलेत.

दरम्यान आज भारतीय निवडणूक आयोगाची बैठक होण्याआधीच म्हणजेच आचारसंहिता लागू होण्याआधीच शिंदे सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.

शिंदे सरकारने आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक मोठा मास्टर स्ट्रोक लगावला आहे. आचारसंहिता लागू होण्याच्या अगदीच काही मिनिटांच्या आधी शिंदे सरकारने मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी बोनसची घोषणा केली आहे.

यावेळी या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बोनसच्या रकमेत तब्बल 3000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गेल्यावर्षी अर्थातच 2023 मध्ये दिवाळी बोनस म्हणून मुंबई महापालिका अंतर्गत कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना 26,000 रुपयांचा बोनस दिला गेला होता.

यंदाही या कर्मचाऱ्यांना तेवढाच बोनस मिळणार असे म्हटले जात होते. कारण की विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर राज्य सरकारला यामध्ये हस्तक्षेप करता येणार नव्हता.

महापालिका प्रशासन जेवढा बोनस देणार तेवढाच बोनस कर्मचाऱ्यांना घ्यावा लागणार होता. दुसरीकडे सदर नोकरदार मंडळीच्या माध्यमातून यावेळी बोनसची रक्कम वाढवली गेली पाहिजे अशी मागणी जोर धरत होती.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या नोकरदार मंडळीला मोठा दिलासा देत मुंबई महापालिका अंतर्गत कार्यरत असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर 29 हजार रुपयांचा बोनस जाहीर केला आहे. यामुळे या सदर नोकरदार मंडळीची यंदाची दिवाळी गोड होणार अशी आशा आहे.

तसेच महापालिका अंतर्गत येणाऱ्या सामाजिक आरोग्य स्वयंसेविका यांना बारा हजार रुपये आणि बालवाडी शिक्षिका, मदतनीस यांना 5 हजार रुपये बोनस जाहीर करण्यात आला आहे. यामुळे या सर्व नोकरदार मंडळीची यंदाची दिवाळी फारच आनंदात साजरा होईल अशी आशा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe