Hapus Mango : सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने नवीन विक्रम प्रस्थापित केले आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात तर तापमान वाढीमुळे नागरिक फारच त्रस्त झाले आहेत. अनेक ठिकाणी तापमान 44 ते 45 अंश सेल्सिअसच्या दरम्यान नमूद केले जात आहे.
दरम्यान अशा या तापदायक उन्हाळ्यात खवय्याकडून आंब्यावर मोठ्या प्रमाणात ताव मारला जात आहे. खरेतर, आंबा हा फळांचा राजा आहे आणि भारतीयांचे सर्वात आवडीचे फळ म्हणजे आंबा. यामुळे उन्हाळा लागला की सर्वजण आंब्यावर ताव मारतात.

दरम्यान जर तुम्हालाही मनापासून आंब्याची आवड असेल तर आजचा हा माहितीपर लेख फक्त तुमच्याच कामाचा आहे. खरंतर, सध्या आंब्याचा सिझन सुरू आहे आणि अनेक जण आंब्याच्या पेट्या खरेदी करत आहेत. जर तुम्हीही आंब्याच्या या सीझनमध्ये आंब्याची पेटी खरेदी केली असेल तर पेटीमध्ये तुम्ही एक पुडी नक्कीच पाहिली असणार.
आता तुम्हाला आंब्याच्या पेटीमध्ये असणारी ही पुडी नेमकी कशाची? ती आंब्याच्या पेटीमध्ये का टाकतात? याचे फायदे अन याचे तोटे काय ? असे अनेक प्रश्न पडले असतील. दरम्यान आज आपण याच प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत.
आंब्याच्या पेटीमध्ये कशाची पुडी टाकतात?
खरे तर, आंब्याच्या पेटीमध्ये जी पुडी टाकली जाते ती एका घातक रसायनाची पुडी असते. या पुडीमध्ये कॅल्शियम कार्बाइड नावाचं रसायन भरलेलं असतं अशी माहिती जाणकार लोकांनी दिली आहे.
हे असे एक रसायन आहे ज्याचा वापर फळे पिकवण्यासाठी केला जातो. कच्ची फळे या रसायनामुळे लवकर पिकतात. आंबे पिकवण्यासाठी सुद्धा याचाच वापर होतो.
मात्र यामुळे आंबे पिकत असली तरी देखील अशा पद्धतीने आंबे पिकवणे चुकीच असून याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता असते. हेच कारण आहे की अशा पद्धतीने आंबे पिकवण्यावर शासनाकडून बंदी घालण्यात आली आहे आणि या रसायनाचा वापर करण्यावर देखील बंदी आहे.
खाद्य आणि आरोग्य विभागाकडून कॅल्शियम कार्बाइड या रसायनाच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की एफ एस एस ए आय म्हणजे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने यासंदर्भात कडक इशारा दिला आहे.
या संबंधित प्राधिकरणाकडून व्यापाऱ्यांना, फळ विक्रेत्यांना आणि खाद्यपदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यांना फळं पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर करू नये अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे. मात्र असे असतानाही आजही सर्रासपणे या रसायनाचा वापर करून आंबे पिकवले जात आहेत ही वास्तविकता नाकारून चालणार नाही.