शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! हरभऱ्याचा नवीन वाण विकसित, परभणी कृषी विद्यापीठाची कामगिरी

यंदाही हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात पेरणी होणार आहे. यावर्षी मान्सूनच्या चार महिन्यांमध्ये जोरदार पाऊस झाला असल्याने यंदा हरभरा लागवडी खालील क्षेत्र किंचित वाढणार असा आशावाद तज्ञांकडून व्यक्त होत आहे. अशातच परभणी कृषी विद्यापीठाने विकसित केलेला नवीन वाण भारताच्या राजपत्रात समाविष्ट करण्यात आला आहे.

Tejas B Shelar
Published:
Harbhra Lagwad

Harbhra Lagwad : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने हरभऱ्याचा एक नवीन वाण विकसित केला आहे. हा वाण महाराष्ट्र राज्यासाठी शिफारशीत करण्यात आला असून नुकतेच या वाणाचा समावेश भारताच्‍या राजपत्रात करण्‍यात आला आहे. खरे तर सध्या रब्बी हंगाम सुरू आहे.

रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकांची पेरणी सुरु झाली आहे. हरभरा पिकाबाबत बोलायचं झालं तर हरभऱ्याची लागवड आपल्या महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये केली जाते. मराठवाडा आणि विदर्भ विभागात रब्बी हंगामात उत्पादित होणारे हे एक महत्त्वाचे पीक आहे.

यंदाही हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात पेरणी होणार आहे. यावर्षी मान्सूनच्या चार महिन्यांमध्ये जोरदार पाऊस झाला असल्याने यंदा हरभरा लागवडी खालील क्षेत्र किंचित वाढणार असा आशावाद तज्ञांकडून व्यक्त होत आहे. अशातच परभणी कृषी विद्यापीठाने विकसित केलेला नवीन वाण भारताच्या राजपत्रात समाविष्ट करण्यात आला आहे.

अशा परिस्थितीत आज आपण परभणी कृषी विद्यापीठाच्या या नव्याने विकसित झालेल्या हरभऱ्याच्या जातीची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया परभणी कृषी विद्यापीठाचा हा नवीन वाण कोणता आहे आणि त्याच्या विशेषता काय आहेत?

परभणी कृषी विद्यापीठाचा नवीन हरभरा वाण

परभणी कृषी विद्यापीठाने परभणी चना – १६ (बीडीएनजी २०१८-१६) हा हरभऱ्याचा वाण अलीकडेचं विकसित केला आहे. परभणी कृषी विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्राने हा वाण विकसित केला आहे. कृषी विद्यापीठाचा हा वाण महाराष्ट्र राज्यासाठी प्रसारित करण्यात आला आहे.

या जातीपासून सरासरी पेक्षा अधिकचे उत्पादन मिळवता येऊ शकते असा दावा कृषी तज्ञांनी केला आहे. हरभऱ्याचा हा नवीन वाण 110 ते 115 दिवसात परिपक्व होतो. या जातीच्या हरभऱ्याचे दाणे हे टपोरे असतात.

ही जात मर रोगास प्रतिबंधक आहे. या जातीच्या शंभर दाण्याचे वजन हे 29 ग्रॅम भरत असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे. या जातीवर किडीचा प्रादुर्भाव देखील तुलनेने कमी होतो असे कृषी शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

यामुळे हरभऱ्याच्या या जातीची लागवड केल्यास शेतकऱ्यांना अधिकचे उत्पादन मिळणार आहे. कमी खर्चात शेतकऱ्यांना या जातीपासून चांगले उत्पादन मिळेल असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे. यामुळे जर तुम्हीही यंदा हरभरा पेरणी करण्याच्या विचारात असाल तर या जातीची निवड करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe