Home Loan Best Timing : प्राईम लोकेशनवर घर असावे मग त्यासाठी संपूर्ण आयुष्याची कमाई गेली तरी चालेल असा अनेकांचा दृष्टीकोन असतो. पण घराच्या वाढलेल्या किंमती पाहता मनपसंत घरासाठी फारच कष्ट घ्यावे लागतात. प्रत्येकाकडेचं घर खरेदी करण्यासाठी आवश्यक बजेट नसते. यासाठी मग अनेकजण गृह कर्जाचा विचार करतात.
दरम्यान जर तुमचाही Home Loan घेऊन आलिशान घर खरेदीचा जबराट प्लॅन असेल तर आजची बातमी फक्त अन फक्त तुमच्यासाठीचं आहे. खरेतर, सध्या होम लोन व्याजदरात अनेक बँकाकडून कपात करण्यात आली आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाने गेल्या महिन्यात रेपो रेटमध्ये कपात केली.

आरबीआयने रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉईंटने कपात केली असून सध्या रेपो रेट 6.25 टक्के इतके आहेत. आधी रेपो रेट 6.50% होते. दरम्यान रेपो रेट मध्ये कपात झाल्यानंतर बँकांकडून गृह कर्जाच्या व्याजदरात देखील कपात केली जात आहे. जाणकार लोक सांगतात की योग्य वेळी गृह कर्ज घेणे खूप महत्वाचे असते.
गृह कर्ज घेण्यापूर्वी आपण नेहमीचं व्याज दर, बाजाराची स्थिती, आपले आर्थिक आरोग्य आणि सरकारी धोरणे लक्षात ठेवून निर्णय घ्यायला हवा. दरम्यान आता बँकांकडून व्याजदरात कपात केली जात असल्याने सध्याचा काळ हा होम लोन घेण्यासाठी सर्वोत्कृष्ट आहे का? असा प्रश्न उपस्थित होतोय. दरम्यान आज आपण जाणकार लोकांनी याबाबत काय मत व्यक्त केले आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
सध्याचा काळ होम लोनसाठी फायद्याचा आहे का?
गेल्या महिन्यात अर्थातच फेब्रुवारीत एमपीसीच्या बैठकीत आरबीआयने रेपो दर 6.50 टक्क्यांवरून 25 बीपीएस पॉईंटने कमी करण्यात आला आहे. सध्या रेपो रेट 6.25 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. खरेतर, चलनविषयक धोरण समितीने पाच वर्षांनी प्रथमच दर कमी केला आहे. यावर आधारित, वित्तीय संस्थांनी गृह कर्जाचे व्याज दर देखील कमी केला आहे.
आता ज्यांना गृह कर्ज घ्यायचे आहे त्यांच्यासाठी हा एक मोठा दिलासादायक निर्णय आहे. यामुळे सध्याचा काळ हा नक्कीच गृह कर्ज घेणाऱ्यांसाठी फायद्याचा ठरणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला येत्या काही दिवसांनी घरासाठी कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला कमी व्याज दरात कर्ज मिळणार आहे आणि यामुळे तुमचे पैसे वाचणार आहेत.
ईएमआय कमी होणार
जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे, गृह कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना आरबीआयच्या निर्णयाचा फायदा झाला आहे. यामुळे त्यांच्या कर्जाचा EMI कमी होणार आहे आणि आता घर खरेदी केल्यास कमी EMI द्यावा लागणार आहे. समजा आपण 30 वर्षांसाठी 8.75 टक्के दराने 30 लाख रुपये कर्ज घेतले आहे. पूर्वीच्या व्याजदरानुसार, आपला मासिक ईएमआय सुमारे 23,601 रुपये असायचा.
तथापि, व्याज दरात बदल झाल्यामुळे आता त्यांची ईएमआय 23,067 रुपयांपर्यंत कमी झाला आहे. अशाप्रकारे, तुमचे एकूण 1,92,098 रुपये वाचणार आहेत. दरम्यान जर आपण व्याजदरात कपात होण्यापूर्वी जेवढा ईएमआय होता तोच ईएमआय दरात कपात झाल्यानंतरही कायम ठेवला तर तुमचे कर्ज लवकर फिटणार आहे.