Home Loan News : अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत आणि यामुळे घर खरेदीसाठी अनेकजण गृह कर्जाचा पर्याय स्वीकारताना आपल्याला दिसतात. गृह कर्ज घेऊन घराचे स्वप्न पूर्ण करणे काही अंशी फायद्याचे देखील आहे.
दरम्यान जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात गृह कर्ज घेण्याच्या तयारीत असाल किंवा गृह कर्ज घेतलेले असेल तर तुमच्यासाठी एक अगदीच आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आरबीआय पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये कपात करण्याची दाट शक्यता आहे.

नुकत्याच काही दिवसांपूर्वी आरबीआयने रेपो रेटमध्ये 25 बसेस पॉईंटने कपात केली होती. दरम्यान आता आरबीआय पुन्हा एकदा असाच एक निर्णय घेऊन होम लोन घेणाऱ्या नागरिकांना दिलासा देऊ शकते अशी बातमी समोर आली आहे. गेल्यावेळी आरबीआयने 25 बेसिस पॉईंटने रेपो रेट मध्ये कपात केली.
रेपो रेट आता 6.50 टक्क्यांवरून 6.25 टक्क्यांपर्यंत खाली आले आहेत. दरम्यान आता आपण यावेळी आरबीआयने रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला तर रेपो रेट कितीने कमी होणार? याबाबतचा निर्णय घेण्याचे कारण काय असू शकते? याचाच सविस्तर आढावा देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
रेपो रेट किती कमी होणार?
फेब्रुवारी महिन्यात रिझर्व बँक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉईंटने कपात केली. रेपो रेट 6.50 टक्क्यांवरून 6.25 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आलेत. दरम्यान आता यावेळी पुन्हा एकदा आरबीआयकडून 25 बसेस पॉइंटने रेपो रेट मध्ये कपात होण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
म्हणजेच रेपो रेट 6.25 टक्यांवरून सहा टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतात असा तज्ञांचा अंदाज आहे. यामुळे बँकिंग सिस्टम मधील लिक्विडिटी वाढणार आहे. सध्या बँकिंग सिस्टम मध्ये 1.93 लाख कोटी रुपयांची सरप्लस लिक्विडिटी असल्याची नोंद करण्यात आली आहे.
केव्हा होऊ शकतो निर्णय?
रिझर्व्ह बँक (RBI) पुढील आठवड्यात आपल्या मॉनिटरी पॉलिसीमध्ये व्याजदर कपातीची घोषणा करू शकते. RBI ची पतधोरण बैठक 7 एप्रिलला सुरू होणार आहे. त्याचे निकाल 9 एप्रिलला येतील.
अर्थतज्ज्ञांच्या मते, मध्यवर्ती बँकेच्या उपाययोजनांमुळे बँकिंग प्रणालीत तरलता वाढली आहे. असे असूनही, आर्थिक वृद्धी वाढवण्यासाठी पुढील आठवड्यात रेपो दर पुन्हा एकदा 25 बेसिस पॉईंटने कमी होण्याची शक्यता आहे.
रेपो रेटमध्ये कपात का होणार?
अर्थतज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, अमेरिकेने रेसिप्रोकल टॅरिफ लादल्यानंतर सेंट्रल बँकेकडून व्याजदर कमी करण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यांचा विश्वास आहे की प्रणालीतील अतिरिक्त तरलतेमुळे, बँका लवकरच ग्राहकांना व्याजदर कपातीचा लाभ देण्याचा प्रयत्न करू शकतात.
निधीची उच्च किंमत आणि प्रणालीतील तरलतेच्या अभावामुळे, बँका फेब्रुवारीमध्ये व्याजदरात झालेल्या कपातीचा संपूर्ण लाभ ग्राहकांना देऊ शकल्या नाहीत. अशा स्थितीत व्याजदरात आणखी एक कपात होण्याची शक्यता वाढली आहे.