Home Loan News : आरबीआय ने अलीकडेच रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआय ने अलीकडेच दोनदा रेपो रेटमध्ये कपात केली. आरबीआयचे रेपो रेट 0.50 टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत. आरबीआयकडून रेपो रेट 6.50 टक्क्यांवरून सहा टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहेत.
रेपो रेटमध्ये कपात झाल्यानंतर देशातील अनेक बँकांकडून होम लोन सहित सर्व प्रकारचे कर्ज स्वस्त करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत सध्याचा काळ हा होम लोन घेण्यासाठी सर्वोत्कृष्ट असल्याचा दावा केला जातोय.

दरम्यान आरबीआयच्या या निर्णयानंतर देशातील अनेक बँकांनी आपल्या होम लोनच्या व्याजदरात कपात केली असून आज आपण सर्वात कमी व्याजदरात होम लोन ऑफर करणाऱ्या काही प्रमुख बँकांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
सर्वात कमी व्याजदरात होम लोन देणाऱ्या बँका
बजाज हाऊसिग फायनान्स : बजाज हाऊसिंग फायनान्स ही फायनान्स कंपनी सर्वात कमी व्याजदरात होम लोन ऑफर करणारी कंपनी बनली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बजाज हाऊसिंग फायनान्स आपल्या ग्राहकांना 7.99% व्याजदरात होम लोन ऑफर करत आहे.
ही प्रायव्हेट हाऊसिंग फायनान्स कंपनी ग्राहकांना कमी इंटरेस्ट रेटमध्ये होम लोन ऑफर करत असल्याने अनेकजण या वित्तीय संस्थेकडून गृह कर्ज घेण्यास पसंती दाखवत आहेत.
बँक ऑफ बडोदा : बँक ऑफ बडोदा ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सरकारी बँक म्हणून ओळखली जाते. ही सार्वजनिक क्षेत्रातील बँक आपल्या ग्राहकांना कमी व्याजदरात होम लोन ऑफर करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही बँक आपल्या ग्राहकांना 8% व्याजदरात गृह कर्ज देत आहे. आधी या बँकेचा होम लोनचा व्याजदर 8.40% एवढा होता मात्र आता हा व्याजदर 8% पर्यंत कमी करण्यात आला आहे.
पण हा बँकेचा सुरुवातीचा व्याजदर असून याचा फायदा फक्त ज्या लोकांचा सिबिल स्कोर चांगला असतो त्यांनाच मिळणार आहे. 800 किंवा 800 च्या आसपास सिबिल स्कोर असणाऱ्या ग्राहकांना बँकेकडून या किमान व्याज दरात गृह कर्ज पुरवले जात आहे.
एसबीआयचे व्याजदर कसे आहेत ?
स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक. ही देशातील सर्वाधिक सुरक्षित बँक म्हणूनही ओळखली जाते. या बँकेबाबत बोलायचं झालं तर ही बँक आपल्या ग्राहकांना किमान 8% व्याजदरात गृह कर्ज पुरवत आहे. मात्र या व्याजदरात गृह कर्ज हवे असेल तर ग्राहकांचा सिबिल स्कोर 800 च्या आसपास असणे आवश्यक आहे.
दरम्यान एसबीआयचे गृह कर्जाचे व्याजदर एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेटशी (ईबीएलआर) जोडलेलं असतं. याचाच अर्थ असा की, रेपो रेटमध्ये बदल झाल्यानंतर एसबीआयच्या गृहकर्जाच्या व्याजदरात देखील बदल होत असतो.