Cobra Snake Information :- सापाबद्दल जर आपण भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाचा विचार केला तर अनेक कथा किंवा पुराण कथा खूप प्रसिद्ध आहेत. जगाच्या पाठीवर सापांच्या अनेक प्रजाती असून त्यापैकी भारतात आढळणारी किंग कोब्रा एक विषारी सापाची
जात असून हा साप त्याच्या आकारामुळे खूप आकर्षक आहे. कोब्रा जातीचा साप प्रामुख्याने आशिया खंडामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. परंतु सापांचा जन्म कसा होतो किंवा सापाच्या मादी या ठराविक संख्येने अंडी घालण्यासाठी सक्षम आहेत किंवा नाही.
सापांचे सर्व अंडी उबतात का आणि त्यापैकी किती जगतात? सापाच्या कोब्रा जातीच्या मादीला पिल्लांना वाचवण्यासाठी काही विशेष प्रयत्न करावे लागतात का? इत्यादी बाबत आपण महत्त्वाची माहिती या लेखात घेणार आहोत.
कोब्रा प्रजातीचा साप कसा असतो?
पूर्ण प्रौढ किंग कोब्रा पिवळा, हिरवा, तपकिरी आणि काळा रंगाचा असतो. साधारणपणे त्याच्या अंगावर एक तर पिवळे किंवा पांढरे आडवे जाड पट्टे असतात. तसेच या सापाची पिल्ले पूर्णपणे काळ्या रंगाचे असतात आणि संपूर्ण शरीरावर पिवळे किंवा पांढरे पट्टे असतात.
भारतामध्ये मुबलक प्रमाणात हा साप आढळतो व अत्यंत विषारी श्रेणीमध्ये गणला जातो. किंग कोब्रा प्रामुख्याने दक्षिण पूर्व आशिया आणि भारतामध्ये आढळून येतो.जर आपण या सापाचे अन्न पाहिले तर ते प्रामुख्याने प्राणी तसेच इतर साप व पक्षी,
उंदीर आणि सरडे मोठ्या प्रमाणावर खातात. उंदीर व जमिनीवरील इतर कीटकांना ते खात असल्यामुळे इतर हानिकारक कीटकांपासून पिकांचे संरक्षण होण्यास देखील मदत होते. हा एक मजबूत असा साप असतो.
कोब्रा जातीचा साप त्याच्या शेपटीच्या साह्याने त्याच्या शरीराचे संपूर्ण वजन देखील उचलू शकतो. कोब्रा जातीच्या सापाची लांबी तीन ते पाच मीटर असते व कधीकधी त्याची लांबी सहा मीटर पर्यंत देखील असते. त्यामुळे या सापाला जगातील सर्वात लांब साप देखील म्हटले जाते.
किंग कोब्रा जातीची मादी व तिचे अंडी घालण्याचे स्वरूप
किंग कोब्रा जातीच्या मादीचा विचार केला तर ती अंडी घालण्यासाठी घरटी बनवते व सापाची ही अशी एकमेव प्रजात आहे कि ती अंड्यांसाठी घरटे बनवते. प्रामुख्याने ही घरटी झाडांच्या खोडाच्या पायथ्याशी बांधली जातात. साधारणपणे एका घरट्यामध्ये एका वेळी सात ते 43 अंडी असू शकतात.
एकूण अंड्यांपैकी सहा ते 38 अंड्यांचे 66 ते 105 दिवसानंतर पिल्लांमध्ये रूपांतर होते. विशेष म्हणजे अंड्यांमधून पिल्लांचा जन्म होईपर्यंत कोब्रा जातीची मादी ही अंड्यांचे स्वतः संरक्षण करते.किंग कोब्राचा प्रजनन काळ पाहिला तर तो जानेवारी ते एप्रिल दरम्यान असतो व मादी कोब्रा एकावेळी 21 ते 40 अंडी घालते.
अंडी घातल्यानंतर संपूर्ण वसंत ऋतु आणि उन्हाळ्यामध्ये अंड्यांचे संरक्षण करते व पावसाळ्यामध्ये ही पिल्ले अंड्यांमधून बाहेर येतात. एकूण अंड्यांपैकी फक्त दोन ते 35 अंड्यांमधून सापाची पिल्ले बाहेर येतात.अंड्यांमधून जी पिल्ले बाहेर येतात त्यांची लांबी 20 ते 30 cm असते
व पिलांचा रंग सात दिवसापर्यंत पांढरा राहतो व नंतर तो काळा होतो आणि त्यांना दात येतात. परंतु त्यांचे वय जसे जसे वाढू लागते तसा तसा त्यांचा रंग फिकट होऊ लागतो व साधारणपणे 21 दिवसांमध्ये ते विष तयार करण्यास सक्षम होतात. हे विष प्रौढ किंग कोब्रा इतकेच प्रभावी असते.