Hyundai Creta News : आपल्यापैकी अनेकांचे स्वतःची एक कार असावी असे स्वप्न असेल. कदाचित तुम्हीही हे स्वप्न पाहिलेच असेल. खरे तर बाजारात विविध कंपन्यांच्या कार्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पण यातील ह्युंदाई कंपनीची क्रेटा या कारला गेल्या काही महिन्यांपासून मोठी डिमांड आली असल्याचे चित्र आहे.
यामुळे सध्या ही गाडी विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. या गाडीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही महिन्यांच्या काळात अनेकांनी ही गाडी खरेदी केली असून अजूनही अनेक जण ही गाडी खरेदी करण्याच्या तयारीत आहेत.
दरम्यान, जर तुम्ही ही गाडी खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. आज आपण ह्युंदाई क्रेटा खरेदी करण्यासाठी किती पगार असायला हवा? पन्नास हजार पगार असेल तर ही गाडी खरेदी करणे योग्य ठरणार का? याबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
किती पगार असल्यास खरेदी करावी हुंडाई क्रेटा
ह्युंदाई ही एक लोकप्रिय ऑटोमेकर कंपनी आहे. या ऑटो कंपनीच्या अनेक गाड्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. ह्युंदाई क्रेटा ही देखील अशीच एक लोकप्रिय कार आहे. या गाडीच्या किमती बाबत बोलायचं झालं तर ही गाडी देशाची राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीत अकरा लाखांच्या आसपास उपलब्ध आहे.
दिल्लीत ह्युंदाई क्रेटाच्या बेस मॉडेल ‘क्रेटा ई’ ची एक्स शोरुम किंमत 10,99,900 रुपये एवढी आहे. येथे या मॉडेलची ऑन-रोड किंमत 12,80,000 रुपयांच्या आसपास आहे. ही गाडी 1.5 लिटर तीन इंजिन व्हेरियंट्समध्ये ती बाजारात उपलब्ध आहे.
नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन, टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आणि डिझेल इंजिन असे ते तीन व्हेरियंट्स आहेत. ह्युंदाई क्रेटामध्ये ADAS लेव्हल 2, 360 डिग्री कॅमेरा, पावर्ड ड्राईव्ह सीट, व्हेंटिलेटेड सीट्स अशी अनेक फीचर्स मिळतात.
तिच्यात अद्ययावत एन्फोटेनमेंट सिस्टिमही देण्यात आली आहे. 70 पेक्षा जास्त सेफ्टी फीचर्सही देण्यात आली आहेत. या गाडीचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन दमदार आहेत. गाडीचा लुक देखील जबरदस्त आहे.
यामुळे तरुण वर्ग या गाडीकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहे. पण 50 हजार रुपये पगार असेल तर ही गाडी खरेदी केली पाहिजे का? तर याचे उत्तर नाही असे आहे.
जाणकार लोक सांगतात की, जर तुम्ही ही गाडी खरेदी करण्यासाठी दीड लाख रुपये डाऊन पेमेंट भरले आणि बाकीचे अकरा लाख तीस हजार रुपये लोन घेतले तर तुम्हाला 9.80% दराने 28 हजार रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.
यावरून या गाडीचा हप्ता, गाडीचा इतर खर्च तसेच तुमचा इतर खर्च लक्षात घेता किमान 80 ते 90 हजार रुपये पगार असणाऱ्या लोकांनी ही गाडी खरेदी करण्यास काही हरकत नाही असा सल्ला जाणकारांनी दिला आहे.