तुम्ही बेमोसमी फळे खाताय तर मग आधी हे वाचा आणि मगच फळे खा… ! कारण

Published on -

सदृढ आरोग्यासाठी इतर प्रोटिन्स खाण्याऐवजी फळे खाणे कधीही उत्तम. अनेकदा आजारी व्यक्तीला डॉक्टर देखील फळे खाण्याचा सल्ला देतात. बाजारात सध्या अनेक फळे विक्री केलीजात आहे.

यातील अनेक रसाळ व टवटवीत फळे पाहून तोंडाला पाणी सुटते. मात्र या विकल्या जाणाऱ्या शेकडो फळांमध्ये ३० टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात कीटकनाशके असल्याचे अनेक वैज्ञानिक अभ्यासात आढळले आहे. एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जादा प्रमाणात कीटकनाशकांचा वापर म्हणजे मोठ्या आजारांना निमंत्रण ठरते.त्यामुळे फळे खाण्यापूर्वी थोड थांबा..

भाज्या आणि फळे सकस मानली जातात. रोजच्या आहारात त्यांचा समावेश केला जातो. सिझन संपला तरी अनेक फळे अगदी स्थानिक बाजारात देखील हमखास मिळत असतात. त्यामुळे त्यांचे सेवन दररोज केले जात असते; परंतु तुम्ही खरेदी करून आणलेली फळे ही आरोग्यास चांगलीआहेत का. ते पहा कारण
या फळांसोबत तुम्ही दररोज ०.६५ मायक्रो ग्रॅम घातक रसायने पोटात घेत असल्याचे संशोधनातून धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

छत्तीसगडमधील इंदिरा गांधी कृषी महाविद्यालयाचे कीटक विज्ञानाचे वैज्ञानिक डॉ. गजेंद्र चंद्राकर यांनी केलेल्या संशोधनात हा खुलासा झालेला आहे.
बाजारात विकण्यासाठी फळे बागेतून शहरात आणावी लागतात. मार्केटमध्ये साठवून ठेवावी लागतात.

या काळात फळे टिकावीत, त्यांचे आयुष्य वाढावे, ती लवकर खराब होऊ नयेत यासाठी डीडीटी, इथरेल तसेच जिब्रालिकचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असतो. घातक रसायनांचा वापर करून ती पिकविली जातात मगच तुम्हा-आम्हाला विकली जात असतात. फळे टिकवणे आणि पिकवण्यासाठी वापरलेल्या घातक रसायनांमुळे त्वचेचे विकार, डायबेटिस, पीसीओडी विकार होण्याचा धोका वाढतो.

सध्या अनेक फळांचा सिझन नाही. तरीही ही फळे बाजारात उपलब्ध आहेत. कारण अनेक महिने शीतगृहात ठेवलेली फळे आता विक्रीसाठी बाहेर काढण्यात आली आहेत. हि फळे अधिक काळ टिकावी यासाठी फळांचे देखील लसीकरण होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

त्यामुळे फळे खाताना आपण काय खातोय याचे भान ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा मोठ्या आजारास निमंत्रण देऊ शकतो. त्यामुळे फळे खाताना विशेष काळजी घेणे गरजचे आहे. जसे फळे खाण्याआधी कमीत कमी तीन तास पाण्यात बुडवून ठेवा. मोसमात येणाऱ्या फळांचे सेवन करण्यास प्राधान्य द्या. हायब्रीड फळांचा वापर कमीत कमी करावा.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe