7th Pay Commission : केंद्र सरकार कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शन धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा महागाई भत्ता वाढीच्या संदर्भात. खरं तर, सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळत असतो.
पहिल्यांदा जानेवारी महिन्यापासून आणि दुसऱ्यांदा जुलै महिन्यापासून महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळतो. जानेवारी महिन्यापासून चा महागाई भत्ता वाढीचा निर्णय हा साधारणता मार्च महिन्यात आणि जुलै महिन्यापासून च्या महागाई भत्ता वाढीचा निर्णय हा साधारणता दिवाळीच्या आसपास होतो.

यानुसार मार्च महिन्यात केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. दरम्यान आता पुढील महागाई भत्ता वाढ म्हणजे जुलै महिन्यापासून महागाई भत्ता कितीने वाढणार हा मोठा सवाल आहे आणि याच संदर्भात एक नवीन माहिती सुद्धा हाती आली आहे.
महागाई भत्ता वाढ कशी ठरवली जाते?
कंजूमर प्राईस इंडेक्स फोर इंडस्ट्रियल वर्कर्स म्हणजेच CPI- IW च्या बारा महिन्यांच्या सरासरी आकडेवारीनुसार महागाई भत्ता वाढ ठरवली जाते. महागाई भत्ता वाढीचा एक निश्चित फॉर्मुला आहे. महागाई भत्ता % = [(CPI- IW ची सरासरी आकडेवारी – 261.42) ÷261.42] × 100 हा फॉर्मुला वापरून महागाई भत्ता वाढ ठरवली जाते.
जुलै महिन्यापासून महागाई भत्ता किती वाढणार?
मार्च महिन्यात महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला यामुळे सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 55 टक्के तर आणि महागाई भत्ता मिळतोय. किंवा जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली असून जुलै 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीमधील या एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार ही महागाई भत्ता वाढ ठरविण्यात आली होती. दरम्यान आता जानेवारी 2025 ते जून 2025 या कालावधीमधील एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार जुलै महिन्यापासून महागाई भत्ता किती वाढणार हे ठरणार आहे.
मार्च 2025 पर्यंतच्या सरासरी CPI-IW नुसार, DA चा अंदाजे आकडा 57.06 पर्यंत पोहोचला आहे. जर एप्रिल, मे आणि जून 2025 मध्ये CPI-IW स्थिर राहिला किंवा किंचित वाढला तर ही सरासरी 57.86% पर्यंत जाऊ शकते. म्हणजे यावेळी महागाई भत्ता 58% होऊ शकतो. पण जर ही आकडेवारी 57.50 पेक्षा खाली राहिली तर यावेळी महागाई भत्ता 57% होईल. म्हणजेच महागाई भत्ता 55% वरून 57% किंवा 58% होऊ शकतो.