India 5 Expressway : भारतात आगामी काळात रस्ते कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी 5 नवीन एक्सप्रेसवे उभारले जाणार आहेत. यातील काही महामार्ग आपल्या महाराष्ट्रातूनही जाणार आहेत. अशा परिस्थितीत, आज आपण देशात येत्या काही वर्षात तयार होणाऱ्या आगामी 5 एक्सप्रेसवे संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत.
देशात तयार होणारे 5 नवीन महामार्ग
सुरत-चेन्नई एक्सप्रेसवे : सुरत अन चेन्नई या दोन शहरांना जोडणारा हा एक्सप्रेस वे महाराष्ट्रातून जातो. याचे काम कधीचं सुरू झाले आहे. हा एक बांधकामाधीन महामार्ग असून या महामार्गामुळे महाराष्ट्रातील रस्ते कनेक्टिव्हिटी देखील मजबूत होणार आहे. या एक्सप्रेस व बाबत बोलायचं झालं तर हा एक 1,271 किमी लांबीचा, 4/6-लेन प्रवेश-नियंत्रित एक्सप्रेसवे आहे. यामुळे या दोन शहरांमधील प्रवासाचा कालावधी जवळपास 7 तासाने कमी होईल असा अंदाज आहे.
सोलापूर-कुर्नूल एक्स्प्रेस वे : हा सुद्धा एक प्रवेश नियंत्रित महामार्ग राहणार आहे. हा एक महामार्ग 318 किमी लांबीचा असेल. हा द्रुतगती मार्ग चेन्नई-सोलापूर आर्थिक कॉरिडॉरला देखील जोडला जाणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ सुमारे 9 तासांवरून 5 तासांवर येणार असल्याची माहिती दिली जात आहे. यामुळे सोलापूर ते कुर्नूल दरम्यान चा प्रवास जलद होईल अशी आशा आहे.
नागपूर-विजयवाडा द्रुतगती मार्ग : विदर्भातील नागपूरला आणखी एका महामार्ग प्रकल्पाची भेट मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार नागपूर ते विजयवाडा दरम्यान एक नवीन एक्सप्रेस वे तयार होणार आहे. आंध्र प्रदेशातील विजयवाडा ते महाराष्ट्रातील नागपूर असा हा ४५७ किमी लांबीचा द्रुतगती महामार्ग प्रकल्प राहणार आहे. यामुळे नागपूर ते विजयवाडा या दोन्ही शहरादरम्यान जलद गतीने प्रवास करता येणे शक्य होईल.
दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्ग : दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्ग हा दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ केवळ 12 तासांवर येणार आहे. मुंबई ते दिल्ली हा प्रवास पूर्ण करण्यासाठी सध्या 24 तासांचा वेळ लागतो. मात्र जेव्हा हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा हा प्रवासाचा कालावधी निम्म्याने कमी होण्याची शक्यता आहे. या महामार्ग प्रकल्पामुळे जयपूर, किशनगड, अजमेर, कोटा, चित्तोडगड, उदयपूर, भोपाळ, उज्जैन, इंदूर, अहमदाबाद, वडोदरा आणि सुरत ही शहरे एकमेकांना जोडली जाणार आहेत.
हैदराबाद-विशाखापट्टणम एक्सप्रेसवे : हा 685 किमी लांबीचा ग्रीनफील्ड कॉरिडॉर आहे जो तेलंगणा आणि आंध्र प्रदेशला जोडणार आहे. या महामार्ग प्रकल्पामुळे हैदराबाद ते विशाखापटनम हा प्रवास जलद होणार आहे. त्यामुळे दोन्ही शहरांमधील अंतर ५६ किमीने कमी होईल असे बोलले जात आहे.