India’s First Bullet Train : भारतातील पहिली बुलेट ट्रेन आपल्या महाराष्ट्रातून धावणार आहे. देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई गुजरात मधील अहमदाबाद यादरम्यान देशातील पहिली बुलेट ट्रेन होणार असून या प्रकल्पाचे काम सध्या अगदीच युद्ध पातळीवर सुरू आहे. या प्रकल्पाशी संबंधित सर्व कामे आता जलद गतीने पूर्ण केली जात आहेत. अशातच आता रेल्वे मंत्रालयाकडून या प्रकल्पाच्या संदर्भात एक नवीन अपडेट देण्यात आली आहे.
काय आहे नवीन अपडेट ?
खरे तर आत्तापर्यंत या प्रकल्पाचे गुजरातमध्ये अगदीच युद्ध पातळीवर काम सुरू होते, मात्र महाराष्ट्रात त्या गतीने काम होत नव्हते आणि यामुळे हा प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होणार की नाही असा प्रश्न होता. पण आता महाराष्ट्रातील कामाने देखील वेग पकडला आहे.

एकीकडे मुंबई-अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या बुलेट ट्रेन मार्गावरील शेकडो किलोमीटरच्या ट्रॅकचे काम पूर्ण होत आले आहे. दरम्यान, ही ट्रेन मुंबईच्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि शिळफाटा दरम्यानच्या एका लांब बोगद्यातून जाणार असून आता याच बोगदा प्रकल्पाबाबत एक मोठ अपडेट हाती आल आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स आणि शिळफाटा दरम्यान विकसित होणाऱ्या 21 किलोमीटर लांबीच्या बोगद्यातील एका महत्वाच्या भागाचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाले आहे. रेल्वे मंत्रालयाच्या X खात्यावर या संदर्भातील माहिती नुकतीच शेअर करण्यात आली आहे. भारतीय रेल्वेने याला एक मोठे यश असल्याचे म्हटले आहे आणि याबाबतची माहिती त्यांनी सोशल मीडिया मधून दिली आहे.
रेल्वे मंत्रालयाने बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाची अपडेट शेअर केली आहे. रेल्वे कडून भारतातील पहिली बुलेट ट्रेन चालवण्याच्या दिशेने लक्षणीय प्रगती झाल्याचे सांगण्यात आले आहे. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल कॉरिडॉरवरील एका मोठ्या सतत बोगद्याच्या भागाचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे.
https://x.com/RailMinIndia/status/1944676843103404188?t=0kukW1aapkG8ea7imlvSxA&s=19
बुलेट ट्रेन 21 किमीच्या बोगद्यातून जाणार
बुलेट ट्रेन रेल्वे कॉरिडॉर प्रकल्पामध्ये 21 किमी लांबीच्या बोगद्यावर काम सुरू आहे, ज्यातून बुलेट ट्रेन धावणार आहे. ही बोगद्याची रेल्वे लाईन वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) आणि शिळफाटा दरम्यान विकसित केला जात आहे. दरम्यान आता याच बोगद्याचा एक महत्त्वाचा भाग जो की 2.7 किलोमीटर लांबीचा आहे त्याचे काम पूर्ण करण्यात आला आहे.
न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड (एनएटीएम) वापरून या बोगद्याचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. या 21 किलोमीटर लांबीच्या ट्रॅकमध्ये, 5 किलोमीटरचा भाग NATM पद्धतीने पूर्ण केला जाईल, तर 16 किलोमीटरचा बोगदा बोरिंग मशीन वापरून तयार केला जात आहे.