‘ही’ आहेत भारतातील सर्वाधिक श्रीमंत Top 5 राज्य ! महाराष्ट्र शेजारील राज्याचा देशात पहिला नंबर

भारतातील सर्वाधिक श्रीमंत आणि सर्वाधिक गरीब राज्य कोणते ? याबाबत एक नवीन अहवाल समोर आला आहे. खरे तर सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि आज पावसाळी अधिवेशनात एक अहवाल सादर करण्यात आला आहे.

Published on -

Indias Richest State : भारत हा एक वेगाने विकसित होणारा देश आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. विशेष म्हणजे अर्थतज्ज्ञांनी येत्या काही वर्षांनी देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

मात्र देशातील सर्वच राज्यांचा विकास सारखा नाही. देशातील काही राज्य प्रचंड श्रीमंत आहेत तर काही राज्य फारच गरीब आहेत. अशा परिस्थितीत आज आपण पर कॅपिटा इन्कम नुसार देशातील सर्वाधिक श्रीमंत टॉप पाच राज्य कोणती आहेत? आणि देशातील सर्वाधिक गरिब राज्य कोणते याची माहिती या लेखातून जाणून घेणार आहोत.

ही आहेत देशातील सर्वाधिक श्रीमंत राज्य 

आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या केंद्रीय विधिमंडळाचे म्हणजेच संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या पावसाळी अधिवेशनात वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जात आहे. विरोधकांकडून वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान याच पावसाळी अधिवेशनातून देशातील विकासाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

खरंतर भारत हा एक जलद गतीने विकसित होणारा देश आहे पण भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये दरडोई उत्पन्नात मोठी तफावत असल्याने दिसून आले आहे. दरम्यान याच दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राच्या एका शेजारी राज्याचा पहिला नंबर लागतो. 

गोवा : मिळालेल्या माहितीनुसार दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्र शेजारील राज्य गोवा भारतातील सर्वाधिक श्रीमंत राज्य बनले आहे. आर्थिक वर्ष 2023 – 24 मध्ये गोव्याचे दरडोई उत्पन्न प्रतिव्यक्ती 3.57 लाख रुपये इतके होते. हे दरडोई उत्पन्न देशातील इतर राज्यांच्या तुलनेत फारच अधिक असून दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत गोवा हे देशातील सर्वाधिक श्रीमंत राज्य बनले आहे. 

सिक्कीम : दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत देशातील श्रीमंत शहरांच्या यादीत सिक्कीम या शहराचा सुद्धा नंबर लागतो. हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत राज्य आहे या राज्याचे दरडोई उत्पन्न 2.92 लाख रुपये प्रति व्यक्ती इतके आहे. 

दिल्ली : दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत देशातील सर्वाधिक श्रीमंत राज्यांच्या यादीत राष्ट्रीय राजधानी दिल्लीचा सुद्धा समावेश होतो. या यादीत दिल्लीचा तिसरा नंबर लागतो आणि दिल्लीचे दरडोई उत्पन्न 2.71 लाख रुपये प्रति व्यक्ती इतके आहे. 

चंदिगड : या यादीत चंदिगडचा सुद्धा नंबर लागतो. मिळालेल्या माहितीनुसार चंदिगडचे दरडोई उत्पन्न 2.56 लाख रुपये प्रति व्यक्ती इतके असून या यादीत चंदिगड चौथ्या क्रमांकावर येते. 

पुडुचेरी : हे राज्य दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत देशातील सर्वाधिक श्रीमंत राज्यांच्या यादीत पहिल्या पाच मध्ये येते. या राज्याचे दरडोई उत्पन्न 1.45 लाख रुपये प्रति व्यक्ती असून या यादीत हे राज्य पाचव्या क्रमांकावर येते. 

देशातील सर्वाधिक गरीब राज्य कोणते? 

दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत देशातील सर्वाधिक गरिब राज्यांमध्ये बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंड सारख्या राज्यांचा समावेश होतो. बिहारचे दरडोई उत्पन्न फक्त 327 रुपये प्रति व्यक्ती इतके असून हे देशातील सर्वाधिक गरीब राज्य आहे.

दुसरीकडे लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील सर्वाधिक मोठे राज्य म्हणजेच उत्तर प्रदेश राज्याचे दरडोई उत्पन्न फक्त 50 हजार 341 रुपये प्रति व्यक्ती इतके आहे. याशिवाय झारखंड या राज्याचे दरडोई उत्पन्न 65 हजार 62 रुपये प्रति व्यक्ती इतक आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!