Inverter Battery : सध्या उन्हाळ्याचा हंगाम सुरू आहे आणि यामुळे विजेची खपत वाढली आहे. एसी फ्रिज फॅन कूलर अशा विविध उपकरणांचा वापर वाढलाय आणि यामुळे साहजिकच विजेची खपत सुद्धा वाढत आहे आणि यामुळे वीज वारंवार खंडित होत आहे. ग्रामीण भागात तर वीज खंडित होण्याचे प्रमाण फारच अधिक असते. दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की वीज खंडित होतेच.
दरम्यान, उन्हाळ्यात वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे उन्हाच्या दिवसांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो आणि यामुळे अलीकडे घराघरांत इन्व्हर्टरची गरज वाढली आहे. आपल्यापैकी अनेकांच्या घरात इन्व्हर्टर असेलच.

तसेच काहीजण येत्या काही दिवसांनी नवं इन्व्हर्टर घेण्याच्या तयारीत असतील. दरम्यान जर तुमचाही असाच प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. कारण की आज आपण इन्वर्टर ची बॅटरी किती वर्ष टिकू शकते आणि ही बॅटरी कधी बदलला हवी याबाबत तज्ञ काय सांगतात याविषयी माहिती पाहणार आहोत.
इन्वर्टरची बॅटरी किती वर्ष टिकते
इन्वर्टर ची बॅटरी किती वर्षे टिकणार हा प्रश्न अन याचे उत्तर आपण बॅटरीची काळजी कशी घेतो यावर अवलंबून आहे. इन्व्हर्टर घेतल्यानंतर त्याच्या बॅटरीचे योग्य व्यवस्थापन केले गेले तर बॅटरी अधिक काळ टिकतात मात्र जर असे झाले नाही तर ती लवकर खराब होऊ शकते.
सामान्यतः इन्व्हर्टरची बॅटरी 3 ते 5 वर्ष टिकते. मात्र, बॅटरीचा योग्य वापर आणि देखभाल केल्यास तिचं आयुष्य वाढवता येतं. त्यामुळे इन्वर्टर घेतल्यानंतर जर तुम्हाला सातत्याने बॅटरी बदलायची नसेल तर तुम्ही बॅटरीची योग्य काळजी घेणे सुद्धा आवश्यक आहे.
बॅटरी खराब होऊ नये म्हणून काय कराल
आम्ही आपणास सांगू इच्छितो की इन्वर्टरच्या बॅटरीमध्ये वेळोवेळी पाण्याचा टॉप-अप न करणे, कार्बनची स्वच्छता न करणे, लाईट गेल्यानंतर अनेक उपकरणे एकत्र वापरणे यामुळे बॅटरीवर अतिरिक्त भार येतो.
या चुकांमुळे बॅटरी लवकर खराब होण्याची शक्यता वाढत असते. हेच कारण आहे की, जर तुम्हाला बॅटरी अधिक दिवस टिकवायची असेल तर तुम्ही या चुका टाळायला हव्यात.
बॅटरी कधी बदलणार?
बॅटरी कधी बदलायची याचे सुद्धा संकेत आपल्याला बॅटरी कडून मिळतात. खरेतर, बॅटरीचा बॅकअप कमी झाला असेल, वारंवार बॅटरी बंद पडत असेल किंवा ती गरम होत असेल, तर अशावेळी बॅटरी बदलायला हवी.
अशा वेळी जुनी बॅटरी बदलून नवीन बॅटरी घेणे अधिक फायदेशीर ठरते. पण तरीही बॅटरीची वेळेवर अन योग्य देखभाल केली तर अनावश्यक खर्च टाळता येतो आणि दीर्घकाळपर्यंत आपण इन्वर्टर वापरू शकतो.