रिचार्जपासून ते शॉपिंगपर्यंत सर्वच ठिकाणी JioCoin चा वापर होणार ! जिओकॉइन कुठे-कुठे वापरले जाणार? पहा संपूर्ण यादी

Jio Coin ची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. दरम्यान याच जिओ कॉइन बाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे ती म्हणजे आगामी काळात जिओ कॉइनची खरेदी विक्री सुद्धा सुरू होणार आहे. My Jio अ‍ॅप, Zebpay आणि Koinex सारख्या क्रिप्टो एक्सचेंजमध्ये जिओ कॉइनची एन्ट्री होणार आहे आणि येथूनच याची खरेदी विक्री सुरू होणार असल्याची माहिती आता समोर येत आहे.

Published on -

JioCoin Latest News : भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओ सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. भारताच्या दिग्गज टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने डिजिटल जगात आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. यामुळे सध्या या कंपनीची जोरदार चर्चा सुरू आहे.

खरे तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी कंपनीने स्वत: चे क्रिप्टोकरन्सी सुरु केली आहे. Jio Coin नावाचे स्वतःचे क्रिप्टो करन्सी सुरू करून कंपनीने एक मोठं पाऊल टाकलं आहे. हे Jio Coin पॉलीगॉन ब्लॉकचेनवर आधारित आहे.

हे एक रिवॉर्ड-बेस्ड डिजिटल चलन आहे, ज्याचे उद्दीष्ट डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देणे आणि वापरकर्त्यांना त्यांच्या इंटरनेट वापराच्या बदल्यात बक्षीस देणे असा आहे. वापरकर्त्यांनी JioSphere ब्राउझरद्वारे इंटरनेट ब्राउझिंग केल्यास जिओ कॉइन दिले जाईल.

पण ही केवळ एक नवीन डिजिटल मालमत्ता राहणार नाही तर बर्‍याच सेवांसाठी Jio Coin वापरले जाऊ शकते. रिचार्ज करण्यापासून ते शॉपिंग पर्यंत सर्वच ठिकाणी जिओ कॉइनचा वापर केला जाणे शक्य होणार आहे.

अशा परिस्थितीत आता आपण जिओ कॉइन चा वापर नेमका कोणकोणत्या कामांसाठी होईल ? याची किंमत काय राहील याचा एक थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Jio Coin कुठं चालणार?

जिओ कॉइन हे एक बक्षीस टोकन आहे जे जिओस्फेयर ब्राउझर वापरणाऱ्या वापरकर्त्यांना दिले जाणार आहे. जेव्हा एखादा वापरकर्ता हे ब्राउझर वापरतो, तेव्हा त्याला इंटरनेट ब्राउझिंगच्या बदल्यात जिओ कॉइन बक्षीस म्हणून दिले जाते.

रिलायन्सच्या डिजिटल इकोसिस्टममध्ये या टोकनचा वापर अनेक प्रकारे केला जाऊ शकतो, जसे की, मोबाइल रिचार्ज (जिओचे सिम) करण्यासाठी. तसेच जिओमार्ट आणि रिलायन्स रिटेल स्टोअरमध्ये खरेदीसाठी या जिओ कॉइनचा वापर केला जाऊ शकतो. रिलायन्स गॅस स्टेशन, जिओसिनेमा आणि इतर प्लॅटफॉर्मवर या टोकन अंतर्गत विशेष सूट सुद्धा दिली जाऊ शकते.

जिओ कॉइनची किंमत किती?

जिओ कॉइनची अधिकृत किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु तज्ञांचा असा अंदाज आहे की त्याची प्रारंभिक किंमत प्रति टोकन सुमारे 0.5 डॉलर म्हणजे 43.30 रुपये असू शकते. जिओ कॉइनचा वापर वाढला की त्याची किंमत सुद्धा वाढू शकते.

महत्त्वाची बाब अशी की आगामी काळात जिओ कॉइन My Jio अ‍ॅप, Zebpay आणि Koinex सारख्या क्रिप्टो एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध केले जाऊ शकते, ज्यामुळे वापरकर्त्यांना Jio Coin खरेदी आणि विक्री करण्याची परवानगी मिळणार आहे. म्हणजेच येत्या काळात जिओ कॉइन खरेदी विक्री सुद्धा करता येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe