अखेर निर्णय झालाच ! ‘या’ दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार 4 हजार 500 रुपये

मीडिया रिपोर्टनुसार जुलै आणि ऑगस्ट मध्ये अर्ज केलेल्या अन अर्ज मंजूर झालेल्या महिलांना 19 सप्टेंबर 2024 पर्यंत जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे 4500 दिले जाणार आहेत. सरकारने याची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही मात्र 19 सप्टेंबर पर्यंत या योजनेचे साडेचार हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

Published on -

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत. म्हणजेच एका पात्र महिलेला एका वर्षात 18 हजार रुपये दिले जाणार आहेत.

याचा लाभ राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना दिला जाणार आहे. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना याचा लाभ मिळणार आहे. अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ दिला जाणार आहे.

यासाठी आधी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत होती. मात्र नुकत्याच काही दिवसांपूर्वी शिंदे सरकारने या योजनेसाठी अर्ज करण्यास 30 सप्टेंबर पर्यंत मुदत दिलेली आहे. आतापर्यंत या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या बहुतांशी महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे पैसे मिळाले आहेत.

रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर आणि ऑगस्ट अखेरीस पात्र ठरणाऱ्या जवळपास दीड कोटीहून अधिक महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये ट्रान्सफर करण्यात आले आहेत.

पण ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज केले होते अन या अशा महिलांना अजून पैसे मिळालेले नसतील त्यांना सप्टेंबर महिन्यात 4500 रुपये मिळणार आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार जुलै आणि ऑगस्ट मध्ये अर्ज केलेल्या अन अर्ज मंजूर झालेल्या महिलांना 19 सप्टेंबर 2024 पर्यंत जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे 4500 दिले जाणार आहेत.

सरकारने याची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही मात्र 19 सप्टेंबर पर्यंत या योजनेचे साडेचार हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

पण, इथे एक गोष्ट विशेष लक्षात घेण्यासारखी ती म्हणजे ज्या महिलांनी सप्टेंबर मध्ये अर्ज केला असेल त्या महिलांना सप्टेंबर महिन्यापासूनच लाभ मिळणार आहे.

म्हणजेच सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना फक्त पंधराशे रुपये दिले जाणार आहेत. तसेच, ज्या महिलांनी अजून अर्ज केलेले नसतील त्या महिलांना आता फक्त अंगणवाडी सेविका यांच्याकडे अर्ज करता येणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe