Ladki Bahin Yojana And Annapurna Yojana : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून समाजातील सर्वच घटकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. महिलांसाठी देखील केंद्र आणि राज्य शासनाकडून अनेक महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आल्या आहेत.
गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातील शिंदे सरकारने देखील महिलांसाठी अनेक कौतुकास्पद योजना सुरू केल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर महायुती सरकारने राज्यातील महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी लाडकी बहीण योजना अन्नपूर्णा योजनेसारख्या अनेक योजना सुरू केले आहेत.

यातील लाडकी बहीण योजनेचा लाभही पात्र महिलांना मिळाला आहे. लाडकी बहिण योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात असून आत्तापर्यंत पाच हप्त्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत.
दुसरीकडे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना मोफत तीन गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत. लाडकी बहिण योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या महिलांना आणि उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत पात्र महिलांना तीन गॅस सिलेंडरचे पैसे अनुदान स्वरूपात दिले जाणार आहेत. हे अनुदान थेट डीबीटी च्या माध्यमातून महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र या योजनेचा लाभ फक्त एका कुटुंबातील (Ration Card नुसार) एकाच महिलेला मिळणार आहे.
तसेच ज्या महिलांच्या नावे गॅस कनेक्शन आहे अशाच महिलांना याचा लाभ मिळेल. खरे तर गत काही वर्षांमध्ये गॅस सिलेंडरच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत जर महिलांना एका वर्षात तीन गॅस सिलेंडर मोफत मिळालेत तर त्यांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.
यामुळे ही योजना नेमकी कधीपासून सुरू होणार याचा लाभ केव्हापासून मिळणार असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. म्हणून आज आपण या योजनेच्या पात्रता आणि याचा लाभ नेमका कधीपासून मिळणार याबाबत माहिती पाहणार आहोत.
योजनेच्या पात्रता नेमक्या काय आहेत?
या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या महिलांनाच मिळणार आहे.
यासाठी फक्त आणि फक्त लाडकी बहीण योजना आणि उज्वला योजनेच्या पात्र लाभार्थी महिला पात्र राहणार आहेत.
लाडकी बहिणी योजनेच्या पात्र महिला आणि उज्वला योजनेच्या पात्र महिला यासाठी अर्ज करू शकणार आहेत.
ज्या महिलांच्या नावे गॅस कनेक्शन आहे अशाच महिलांना याचा लाभ मिळेल.
कुटुंबातील फक्त एक महिला याच्या लाभासाठी पात्र राहील.
कधी मिळणार लाभ ?
अन्नपूर्णा योजनेचा लाभ ऑक्टोबर महिन्यापासूनच मिळेल असे बोलले जात आहे. या चालु ऑक्टोबर महिन्यात अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना अनुदानाची रक्कम मिळण्याची शक्यता आहे.
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र महिलांना गॅस वितरकाकडे जाऊन केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. एजन्सी मध्ये जाऊन ई केवायसी ची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे.