Ladki Bahin Yojana : गेल्या वर्षी लाडकी बहिण योजना सुरू झाली आणि तेव्हापासून ही योजना चर्चेत आहे. ही योजना महायुती सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना या योजनेचा महायुती सरकारला निवडणुकीत मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. मात्र आता या योजनेच्या बाबतीत सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून सरकारकडून या योजनेच्या असंख्य महिलांना अपात्र केले जात आहे.
या योजनेसाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जांची सरकारकडून पुन्हा एकदा पडताळणी होत असून या योजनेतील निकषांचा राज्यातील 20 लाख महिला शेतकऱ्यांना फटका बसणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मात्र या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये सरकार विरोधात रोष वाढत चालला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण योजना सुरू झाली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. जुलै महिन्यापासून या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले असून आत्तापर्यंत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या सहा महिन्यांचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.
डिसेंबर महिन्याचा हप्ता नुकत्याच काही दिवसांपूर्वी महिलांच्या खात्यात जमा झाला असून आता जानेवारी महिन्याचा हप्ता हा मकर संक्रांतीच्या आधी लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. 14 जानेवारीच्या आधी लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.
दुसरीकडे आता या योजनेच्या अर्जांची पुन्हा एकदा पडताळणी सुरू झाली आहे. राज्य सरकारकडून पाच निकषांच्या आधारावर अर्जांची छाननी सुरू करण्यात आली आहे. म्हणजेच याआधी ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरल्या होत्या त्या जर या निकषांमध्ये फिट बसल्या नाहीत तर त्यांना अपात्र केले जाणार आहे.
ही योजना सुरू झाली आणि या योजनेसाठी 15 ऑक्टोबर पर्यंत अर्ज भरण्यास मदत देण्यात आली. या मुदतीत राज्यातील दोन कोटी 63 लाख महिलांनी अर्ज भरलेत. यापैकी दोन कोटी 52 लाख महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या असून आत्तापर्यंत या पात्र महिलांना सहा हप्ते देण्यात आले आहेत.
निवडणुकीच्या काळात ही योजना स्थगित करण्यात आली होती मात्र आता पुन्हा एकदा ही योजना सुरू झाली असून डिसेंबर महिन्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात नुकतेच जमा करण्यात आले आहेत. आतापर्यंत लाडक्या बहिणींना सरकारकडून 21,600 कोटी रुपये देण्यात आले आहेत. अशातच आता ज्या महिला नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत त्या महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा पूर्ण लाभ मिळणार नसल्याचे बोलले जात आहे.
नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी ज्या नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी महिला पात्र ठरल्या आहेत त्यांना अठरा हजार रुपयांऐवजी फक्त 12 हजार रुपये दिले जाणार आहेत. राज्यातील जवळपास 20 लाख महिलांना त्याचा फटका बसणार असून त्यांना लाडकी बहीण योजनेचे संपूर्ण पैसे मिळणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.