लाडकी बहीण योजना खरच बंद होणार का ? मुख्यमंत्री शिंदे म्हणालेत डिसेंबर महिन्यात…..

Published on -

Ladki Bahin Yojana : जुलै महिन्यापासून महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू आहे. ही योजना शिंदे सरकारने जाहीर केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे.

याची सुरुवात जुलै महिन्यापासून झाली असून जुलै महिन्यापासूनच याचा लाभ मिळत आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत.

म्हणजेच या अंतर्गत एका वर्षात 18000 रुपयाचा लाभ मिळणार आहे. आतापर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्यांचे पैसे पात्र ठरणाऱ्या महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.

नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऍडव्हान्स मध्येच म्हणजेच ऑक्टोबर महिन्यातच पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. मात्र सध्या राज्यात आचारसंहितेचा काळ सुरू असून यामुळे या योजनेला स्थगिती देण्यात आली आहे.

यामुळे गेल्या काही दिवसांपासून ही योजना बंद झाल्या असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. दरम्यान आता याच योजनेचे संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी माहिती दिली आहे अन योजनेवरून विरोधकांना चांगलेच फैलावर घेतले आहे.

कोल्हापुरातील शिरोळ येथे आयोजित प्रचार सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “ही निवडणूक लाडक्या बहिणींच्या योगदान व शुभेच्छांवर जिंकणार आहे.

लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरलीय. ज्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत, त्यांचा खात्यात डिसेंबरमध्ये जमा होतील. लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांच्या छातीत धडकी भरली आहे.

सावत्र भाऊ लाडकी बहिण योजना बंद करण्यासाठी न्यायालयात गेले आहेत. लाडक्या बहिणीना पैसे दिले, यात आम्ही काय पाप केलं?,” असा जबरदस्त हल्लाबोल केला. पुढे बोलताना मुख्यमंत्री महोदय यांनी, काँग्रेस म्हणत आहे की आमचं सरकार सत्तेत आलं की आम्हाला जेलमध्ये टाकणार आहेत.

पण लाडक्या बहिणींसाठी 100 वेळा मी जेलमध्ये जायला तयार आहे. तसेच, लाडक्या बहीण योजनेत खोडा घालत आहेत, त्यांना कोल्हापूरी जोडा दाखवा. लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही.

ती महिला सक्षमीकरणासाठी आहे, महिला सुखी तर देश सुखी, लाडक्या बहिणी अर्थव्यवस्थेचा कणा आहेत, असंही एकनाथ शिंदे म्हणालेआहेत. हे सरकार देणारे आहे, घेणारे नाही.

हे सरकार देना बँक आहे, लेना बँक नाही असा टोला सुद्धा यावेळी त्यांनी विरोधकांना लगावला. शेतकरी आपला माय बाप आहे. तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe