Maharashtra Government Employee News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी बोनसची घोषणा करण्यात आली होती. रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय पुणे महापालिके अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तसेच अधिकाऱ्यांसाठी नाशिक महापालिके अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तसेच अधिकाऱ्यांसाठी दिवाळी बोनस ची घोषणा करण्यात आली आहे.
ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी देखील दिवाळी बोनसची मोठी घोषणा नुकतीच करण्यात आली असून आता मुंबई महापालिके अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे.

मुंबई महापालिके अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच अधिकाऱ्यांना महापालिके प्रशासनाच्या माध्यमातून यंदाच्या दिवाळीसाठी सव्वीस हजार रुपयांचा बोनस दिला जाऊ शकतो असे वृत्त समोर आले आहे.
महत्त्वाचे म्हणजे या दिवाळी बोनस बाबतची घोषणा याच आठवड्यात होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. यासाठी पालिका प्रशासनाकडून तब्बल 260 कोटी रुपयांची तरतूद सुद्धा करून देण्यात आली आहे.
यामुळे लवकरच दिवाळी बोनस बाबत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खरे तर गेल्यावर्षी अर्थातच 2023 च्या दिवाळीमध्ये मुंबई महापालिके अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेच अधिकाऱ्यांना 26000 चा बोनस मिळाला होता.
यावेळी बोनसची रक्कम वाढेल अशी आशा या सदर कर्मचाऱ्यांना आहे. मात्र पालिका प्रशासन या दिवाळीला देखील आपल्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना 26 हजार रुपये एवढाच दिवाळी बोनस देणार असल्याचे बोलले जात आहे.
आज विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहेत. अशा परिस्थितीत आता पालिका प्रशासन जेवढा बोनस देईल तेवढ्याचं बोनस वर पालिका कर्मचाऱ्यांना समाधान मानावे लागणार आहे. मुंबई महापालिका अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा तसेच अधिकाऱ्यांचा दिवाळी बोनस चा तिढा हा नेहमी महापौरांच्या दालनात सोडवला जात असे.
मात्र 2020 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा बोनसचा तिढा मुख्यमंत्री कार्यालयात सोडवला होता. त्यावेळी महापालिका कर्मचाऱ्यांना पंधरा हजार पाचशे रुपये बोनस देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला होता.
मात्र मुख्यमंत्री कार्यालयात हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर त्यावेळी शासनाने 20000 रुपये बोनस देण्याचा निर्णय घेतला. मात्र यासोबतच पुढील तीन वर्ष मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना फक्त २० हजार रुपये बोनस मिळेल अशी ही अट टाकून देण्यात आली.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे आपल्या हातात घेतल्यानंतर महापालिका कर्मचाऱ्यांना 22500 रुपयांचा बोनस देण्याचा निर्णय घेतला. मागील वर्षी या कर्मचाऱ्यांना 26000 चा बोनस मिळाला होता. यंदाही मात्र महापालिका कर्मचाऱ्यांना 26000 चा बोनस मिळणार असे दिसते.
कारण की आता आचारसंहिता सुरू होणार असून आचारसंहितेच्या कालावधीत राज्य शासनाला बोनस संदर्भात निर्णय घेता येणार नाही. यामुळे महापालिका प्रशासन जेवढा बोनस देईल तेवढीच रक्कम कर्मचाऱ्यांना घ्यावी लागणार आहे.