Maharashtra Government Scheme : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. शेतकरी, शेतमजूर, महिला, अपंग, निराधार अशा गरजवंत लोकांसाठी शासनाकडून असंख्य योजना सुरू आहेत. महिलांसाठी शासनाने शेकडो योजना राबवलेल्या आहेत.
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी राज्य शासनाने त्यांना अनुदानावर पिठाची गिरणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे. यासाठी मोफत पीठ गिरणी योजना सुरू करण्यात आली असून आज आपण याच योजनेच्या बाबत माहिती पाहणार आहोत.

या योजनेअंतर्गत किती अनुदान मिळते आणि लाभार्थ्यांना किती पैसे भरावे लागतात तसेच यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज कसा करावा याबाबतची सविस्तर माहिती आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
मोफत पीठ गिरणी योजनेचा लाभ कोणाला मिळतो?
या योजनेचा लाभ राज्यातील सर्वच महिलांना मिळत नाही. मिळालेल्या माहितीनुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या प्रवर्गातील लोकांना या योजनेच्या माध्यमातून पीठ गिरणी साठी अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे.
या योजनेतून पीठ गिरणी साठी भरीव अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे यामुळे महिलांना गावातच राहून स्वतःचा व्यवसाय सुरू करता येतोय. खरंतर अलीकडे शहरी भागात पिठाची गिरणी ही संकल्पना हळूहळू नाहीशी होऊ लागली आहे.
कारण की आता पॅकेट बंद पीठ मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. विविध ब्रँड चे पीठ आता बाजारात सहज उपलब्ध होत आहे आणि ग्राहकांकडून याला चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतोय. मात्र खेड्यात आजही दररोज धान्य दळण्याची गरज असते आणि यामुळे खेड्यात हा व्यवसाय आजही चांगला चालतो.
किती अनुदान मिळते ?
पीठ गिरणी योजनेतून पात्र महिलांना 90% एवढे अनुदान दिले जाते अशी माहिती संबंधितांच्या माध्यमातून समोर आली आहे. तसेच उर्वरित दहा टक्के अनुदान हे लाभार्थी महिलेला स्वतः टाकावे लागते.
योजनेच्या पात्रता कशा आहेत?
या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील 18 ते 60 वर्ष वयोगटातील महिलांनाच दिला जात आहे. तसेच राज्यातील सर्वच महिलांना याचा लाभ मिळत नाही एससी म्हणजेच शेड्युल कास्ट आणि एसटी म्हणजेच शेड्युल ट्राईब या दोन प्रवर्गातील महिलांना याचा लाभ मिळतोय.
या योजनेचा लाभ वार्षिक उत्पन्न 1.20 लाखांपेक्षा कमी असणाऱ्या कुटुंबातील महिलांनाच मिळतो. ज्या महिलांच्या नावे अर्ज सादर करण्यात आला आहे तिचे बँकेत अकाउंट असणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ विशेषता ग्रामीण भागातील महिलांना दिला जातो.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे?
ज्या महिलांना पीठ गिरणी योजनेअंतर्गत पिठाच्या गिरणी साठी अर्ज करायचा आहे त्यांना आधार कार्ड, इनकम सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, रेशन कार्ड, डोमिसाइल सर्टिफिकेट, बँक पासबुक, पासपोर्ट आकाराचा फोटो, पीठ गिरणी खरेदीसाठी शासनमान्य विक्रेत्याचे कोटेशन अशी महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहेत.
अर्ज कसा आणि कुठे करायचा?
या योजनेसाठी महिलांना ऑफलाईन अर्ज करावा लागतो. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक पंचायत समिती किंवा जिल्हा महिला व बालकल्याण विभागाच्या कार्यालयात इच्छुकांना अर्ज सादर करता येतो. अर्ज करताना वर सांगितलेली आवश्यक कागदपत्रे सुद्धा जमा करावी लागतात.
अर्ज हा विहित नमुन्यात सादर करावा लागतो आणि अर्ज काळजीपूर्वक भरून सादर करावा, अर्जात चूक झाली तर अर्ज बाद होऊ शकतो. संबंधित कार्यालयात जाऊन या योजनेची अधिकची माहिती सुद्धा घेता येऊ शकते.