मुंबईतील वरळी सी लिंकप्रमाणे महाराष्ट्रातील ‘या’ शहरात विकसित होणार 175 कोटी रुपयांचा नवा प्रकल्प ! 2 जिल्ह्यांमधील अंतर 50 किलोमीटरने कमी होणार

देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राचे राज्य राजधानी मुंबई मधील वरळी सी लिंक हा प्रकल्प मुंबईच्या वैभवात भर घालणारा प्रकल्प आहे. दरम्यान आता याच प्रकल्पाच्या धर्तीवर पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा एक नवीन केबल स्टे ब्रिज विकसित होणार आहे.

Published on -

Maharashtra Infrastructure News : मुंबईत आणि महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये अनेक रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी देशाची आर्थिक राजधानी मुंबईला देशातील सर्वाधिक लांबीच्या सागरी पुलाची म्हणजेच अटल सेतूची भेट मिळाली.

तसेच मुंबईमध्ये वरळी सी लिंक प्रकल्प सुद्धा विकसित करण्यात आला आहे. या प्रकल्पांमुळे राजधानी मुंबईत वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांचा प्रवास सुपरफास्ट झालाय. हे प्रकल्प मुंबईच्या विकासात एक मोलाची भूमिका निभावत आहेत.

दुसरीकडे आता मुंबईतील वरळी सी लिंकच्या धर्तीवर पश्चिम महाराष्ट्रातही एक भव्य प्रकल्प साकार होत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पहिला केबलस्टेड ब्रिज सातारा जिल्ह्यात विकसित होत असून यामुळे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरच्या पर्यटनाला चालना मिळणार आहे.

हा प्रकल्प महाबळेश्वरच्या पर्यटनाला चालना देणारा राहणार असून यामुळे कोकणातील नागरिकांना जलद गतीने महाबळेश्वरला पोहोचता येणार आहे. दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातून महाबळेश्वरकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी आणि पर्यटकांसाठी हा प्रकल्प गेम चेंजर राहणार आणि रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना महाबळेश्वरला जलद गतीने पोहोचता येणार आहे.

या प्रकल्पामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना महाबळेश्वर या प्रसिद्ध हिल स्टेशन ला जाण्यासाठी एक नवा, लहान आणि आकर्षक मार्ग उपलब्ध होणार आहे. दरम्यान आता आपण हा केबल स्टेट ब्रिज नेमका कसा असणार याबाबत माहिती पाहणार आहोत.

कसा असणार प्रकल्प ? 

सातारा जिल्ह्यात विकसित होणारा हा केबलस्टेड ब्रिज पश्चिम महाराष्ट्रातील पहिलाच केबलस्टेड ब्रिज राहील असा दावा केला जातोय. हा केबल स्टे ब्रिज सातारा जिल्ह्यातील तापोळा ते रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या गाढवली आहिर या दरम्यान तयार केला जात आहे.

हा पूल कोकण व पश्चिम महाराष्ट्राला थेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देणार असल्याने या दोन्ही विभागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. पर्यटकांसाठी तसेच कोकणातून पश्चिम महाराष्ट्रात ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी हा प्रकल्प फायद्याचा राहणार आहे. यामुळे पोलादपूरच्या आंबेनळी घाटाऐवजी रघुवीर घाटमार्गाने महाबळेश्वरला जाता येणार असल्याची माहिती जाणकारांकडून मिळाली आहे.

2 जिल्ह्यांमधील अंतर 50 किलोमीटरने कमी होणार 

या प्रस्तावित प्रकल्पामुळे रत्नागिरी आणि सातारा या दोन जिल्ह्यांमध्ये अंतर 50 किलोमीटरने कमी होणार आहे. यामुळे दुर्गम कोयना खोरे अधिक सुलभपणे जोडले जाईल असे बोलले जात आहे. या प्रकल्पाच्या खर्चाबाबत बोलायचं झालं तर या प्रकल्पासाठी सुमारे 175 कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाईल.

याचे काम टी अँड टी कंपनीकडे काम सोपवले आहे आणि हे काम अगदीच युद्ध पातळीवर सुरू आहे. या पुलाची लांबी 540 मीटर इतकी राहणार आहे आणि याची रूंदी ही सुमारे 14 मीटर एवढी राहील.

या पुलाच्या मधोमध पर्यटकांना महाबळेश्वराचे सुंदर दृश्य आपल्या नजरेत कैद करता यावेत यासाठी 43 मीटर उंच व्ह्यू गॅलरी उभारली जाणार आहे. येथे पर्यटकांसाठी कॅप्सूल लिफ्ट व जिनेही असतील, यामुळे महाबळेश्वर येथील सुंदर दृश्य सहज टिपता येणे शक्य होणार आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe